मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली असे म्हणता येईल. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकतात. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. आज दुपारी महायुतीमधील नेते राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे शपथविधी होणार आहे.
फडणवीसांच्या शपथविधीची पत्रिका तयार
फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा.
विधिमंडळाच्या गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्या नंतर निर्मला सीतारमन यांनी फडणवीस यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
पंकजा मुंडे यांच्याकडून अनुमोदन…
चंद्रकांत पाटील आणि सुनीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर आणि रवींद्र चव्हाण, संजय कुटे यांनी अनुमोदन दिले.
चंद्रकांत पाटील यांनी ठेवला…
फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव
भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या नेते पदासाठी देवेंद्र सरीताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडत असल्याचे सांगितले.
निवड प्रक्रियेला सुरुवात…
गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपाणी यांनी विधीमंडळाच्या नेत्याची निवड करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी पक्षातील वरीष्ठ नेत्यांनी प्रस्ताव ठेवावा, असे निर्देश् रुपाणी यांनी दिले आहेत.
बावनकुळे फडणवीसांचे नाव विसरले..
भाजप महाराष्ट्र पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे शब्दांनी स्वागत केले. मात्र, बावनकुळे यात देवेंद्र फडडणवीस यांचेच नाव विसरले. हे लक्षात येताच त्यांनी फडणवीसांचे नाव घेतले. यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला.
विधीमंडळ पक्षाची बैठक सुरु..
भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. सर्वात आधी आशिष शेलार हे बोलत असून थोड्याच वेळात गटनेत्याची निवड केली जाणार आहे.
कोअर कमिटीची बैठक संपली तरी नेत्यांमध्ये चर्चा सुरु..
कोअर कमिटीची बैठक संपली असली तरी पक्ष निरीक्षकासोबत देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा सुरु आहे.
सर्व आमदार सेंट्रल हॉलमध्ये
भाजप आणि इतर काही अपक्ष आमदार हे विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये एकत्र आले आहेत. तसेच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली असून थोड्याच वेळात विधिमंडळातील नेत्याची निवड करण्यासाठी आमदारांची बैठक होणार आहे.
मुनगंटीवार-पाटील मांडणार प्रस्ताव..
सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडणार आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील. तर अशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण हे या प्रस्तावावर अनुमोदन देतील.