
संगमेश्वर/ सत्यवान विचारे- संगमेश्वर तालुका भौगलिकदृष्ट्या डोंगर दऱ्या मध्ये विखुरलेला आहे तालुक्यातील वयोवृध्द नागरिक महिला वर्ग मोठ्या प्रमाणात जागा जमिनीच्या कागदपत्रे साठी एस टी बदलत वा मिळेल त्या वाहनाने देवरूख भूमी अभिलेख कार्यालयात येत असतात.. परंतु तेथे गेल्यावर तेथील कर्मचाऱ्यांचे नकारात्मक भूमिकेमुळे निराशा पदरी पडत असुन नागरिकाना रिकाम्या हाती परातावे लागते. या मधे दिवस पैसा वाया जात असुन नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
या बद्दल भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी तेथील कर्मचाऱ्यांना कोणतेही सोयरे सुतक दिसत नाही. कारण येथील गरीब नागरिकांची व्यथा काय होते त्याची कोणतीही जाणं येथील कर्मचारी ठेवताना दिसत नाहीत. या कार्यालयाचे उप अधीक्षक श्री भागवत साहेब हे कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांचे नगरिकाप्रती असलेली वागणूक अशोभनीय आहे त्यामुळे श्री. भागवत साहेब या संदर्भात काय भूमिका घेतात या कडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष आहे