संगमेश्वर : संगमेश्वर जवळील कोंड असुर्डे येथील ज्येष्ठ नागरिक श्री.प्रमोद शंकर पोवळे यांच्या निवासस्थानी बारावी सायन्स मध्ये 82.50% प्राप्त करून सुयश प्राप्त केलेली गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे या शाळेचा गुणवंत विद्यार्थी पियुष चंद्रकांत कारेकर (रा.डेरवण) याचा सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मान्यवर प्रमुख अतिथी मधुकर भुर्के (अजिवली ता.राजापूर) तसेच शिक्षक सचिन गोटखिंडे (उमळवाड,जयसिंगपूर), श्री.संभाजी सूर्यवंशी (उमळवाड ,जयसिंगपूर), श्री.दिनेश अंब्रे (समाजसेवक,संगमेश्वर), आदी मान्यवर उपस्थित होते.
दिनेश आंब्रे, गोटखिंडे सर आणि संभाजी सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.समाजसेवक दिनेश अंब्रे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कविता सादर करून ‘ जागर ‘ या पुस्तकाने पियुष याला सन्मानित केले .
प्रमुख अतिथी श्री मधुकर भुर्के, गोटखिंडे सर व सूर्यवंशी सर यांनी पियुष याला पुष्पगुच्छ देऊन भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी आई-वडील सौ.व श्री. प्रगती चंद्रकांत कारेकर, आजी आजोबा सौ.व श्री. प्रमोदिनी प्रमोद पोवळे, मामा मामी सौ.व श्री. प्राजक्ता प्रशांत पोवळे आणि ताई पायल कारेकर उपस्थित होते.
पियुष याने कॉलेजमध्ये चौथा क्रमांक पटकावला. त्याला वर्गशिक्षक कांबळे सर, देशमुख मॅडम, माने सर व इतर शिक्षकांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.