ठाणे: निलेश घाग दिवा बेतवडे गाव येथील ओम साई सेवा मंडळ (रजि) बेतवडे आयोजित साईबाबा मंदिर येथून बेतवडे गाव ते शिर्डी साई पदयात्रा पालखीचा प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साह आनंदात साजरा झाला यंदाचे मंडळाचे १२ वे वर्ष असून १५० भाविक पालखी बरोबर असून ९ ते १० दिवस पायी चालत साई नामाचा जय घोष करत साईभक्त मोठ्या उत्साहात पदयात्रेत सहभागी झाले सोमवारी ४ डिसेंबर २०२३ रोजी श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहोचतील असे मंडळाचे अध्यक्ष विजय गणपत भोईर यांनी कळवले आहे.आयोजक सुधाकर पाटील खजिनदार किशोर पाटील सल्लागार मधुकर पाटील तर सचिन जयराम पाटील हे आहेत प्रसंगी सदर सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले प्रसंगी दिवा शहरातील अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील शहर संघटक रोहिदास मुंडे युवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर उपशहर प्रमुख वैष्णव पाटील तेजस पोरजी नवनीत पाटील चेतन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जाहिरात
जाहिरात