संगमेश्वर:- प्रणील पडवळ संगमेश्वर रोड स्टेशनवर एकूण ९ गाड्यांना थांबा द्या असे अवाहन निसर्गरम्य चिपळूण व निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले.
▪️त्या आवाहनाला संगमेश्वरवासिय जनतेकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत हजारो च्या वर पत्र कुरियर, पोस्टाच्या माध्यमातून भारताचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठविण्यात आली आहेत. अजूनही जनतेच्या आशीर्वादाचा व पत्रांचा ओघ वाढतोच आहे. या पत्र प्रपंचाने सरकारला जाग येईल असा विश्वास ग्रुप चे प्रमुख तथा पत्रकार संदेश जिमन यांनी व्यक्त केला.
▪️या गृपने रेल्वे प्रशासनाकडे संगमेश्वर साठी
एलटीटी मडगाव एक्सप्रेस, जामनगर, जबलपूर, गांधीधाम,कोचीवली, वेरावल, जनशताब्दी, तेजस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाड्याना थांबा मिळण्याची मागाणी केली आहे.
▪️त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरसुद्धा आमच्या आंदोलनात सहभागी होत असून त्यांचा सुद्धा वाढता पाठिंबा आम्हाला मिळत आहे. त्यासाठी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुप कडून सर्वांचे मनापासून आभार मानले असून यापुढेही असेच आपणा सर्वांचे सहकार्य असेल असा आशावाद व्यक्त केला आहे.