वडोल गावातील बेकायदेशीर सुरू असलेल्या नाश्त्याच्या स्टॉलवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी

Spread the love

उल्हासनगर (प्रतिनिधी)


उल्हासनगर – ३ मध्ये वडोल गावातील बेकायदेशीर सुरू असलेल्या नाश्त्याच्या स्टॉलवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव रविंद्रसिंग पुरणसिंग यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजिज शेख यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव रविंद्रसिंग पुरणसिंग यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजिज शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वडोलगांव सेट जोसेफ स्कुलच्या गेटला लागुन रमेश म्हात्रे व त्यांची पत्नी नंदा म्हात्रे यांनी बेकायदेशीरपणे वडा पाव नाश्त्याचा स्टॉल लावला आहे. सदरील बेकायदेशीर स्टॉल हा संपुर्ण नायलॉनच्या ताडपतडीने झाकले असुन महावितरण (MESB) च्या ट्रान्सफारमरला लागुन आहे. त्याचप्रमाणे सदर सेट जोसेफ स्कूल हे त्याच्या गेटला लागुन असल्याने त्यातील अनेक विद्यार्थी शिकत आहे. त्याचप्रमाणे सदरील व्यक्ती ही गावातील रहिवाशी असल्याने सदर शाळा प्रशासन ही त्यांना घाबरून असल्याने कोणत्याही प्रकारचे कार्यवाही करीत नाही. जर शाळा प्रशासन जाणीवपुर्वक सर्व बाबी माहीती असुन सध्दा दुर्लक्ष करीत असेल तर भविष्यात होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेला शाळा प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव रविंद्रासिंग पुरनसिंग यांनी पालिका आयुक्त अजीज शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

त्याचप्रमाणे सदरहुन काही दिवसापुर्वी तेथील असलेल्या महावितरणच्या (MESB) ट्रान्सफार्मरला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. त्याचा संपुर्ण विडीओ काढण्यात आला आहे. तसेच नाश्ता स्टॉलवर बेकायदेशीर कमर्शियल सिलेंडरचा वापर केला जातो. त्यावरून जर महावितरणच्या (MESB) ट्रान्सफार्मरला लागलेली आग ही भडकली असता त्यात सिलेंडरचा स्फोट होऊन मोठया प्रमाणात शाळेत शिकत असलेल्या विदयार्थी, स्टाफ, इतर गातवातील शेजारील लोकांची मोठया प्रमाणात जीवीत हानी व वित्तहानी झाली असती, परंतु तेथील काही लोकांनी वेळ प्रसंगी आग विजवली आणि मोठा अनर्थ टळला. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव रविंद्रासिंग पुरनसिंग यांनी पालिका आयुक्त अजीज शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या अनुषंगाने तेथील पालकांनी आमच्याकडे तोंडी तक्रारी केल्या असून त्यांच्या मुलांच्या जीवाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. तरी सदर ठिकाणी पुन्हा अशी घटना घडली आणि मोठया प्रमाणात स्फोट होऊन काही घटना घडली तर त्याला फक्त महानगर पालिकेचे कर्मचारी, अधिकारी, सहायक आयुक्त, अतिरिक्त, आयुक्त तसेच, महावितरण (MESB) कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच सेंट जोसेफ स्कूल प्रशासन जबाबदार हेच राहतील. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव रविंद्रासिंग पुरनसिंग यांनी पालिका आयुक्त अजीज शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तरी कृपया करून तत्काळ बेकायदेशीर सुरू असलेला नाश्ताचा स्टॉल काढून टाकण्यात यावे. संबधीत वरील सर्व प्रशासकीय अधिका-यांनी जर वरील सुरू असलेल्या बेकायदेशीर सुरू असलेला नाश्ता स्टॉल हा तत्काळ काढण्यात न आल्यास मला व पालकांना आपल्या विरोधात मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल. या पत्राची प्रत उल्हासनगर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, प्रभाग समिती, उल्हासनगर – ४. चे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय जाधव, कार्यकारी अभियंता महावितरण (MESB) कार्यालय साईबाबा मंदिर, उल्हासनगर-३. यांनाही पाठविली असून या बेकायदेशीर सुरू असलेल्या नाश्त्याच्या स्टॉलवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव रविंद्रासिंग पुरनसिंग यांनी पालिका आयुक्त अजीज शेख यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page