दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उध्दव ठाकरे यांची घेतली भेट…

Spread the love

केंद्र सरकारने नवीन अध्यादेश काढून दिल्ली सरकारचे सर्व अधिकार राज्यपालांना दिले- अरविंद केजरीवाल

नवीदिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सर्व प्रमुख नेत्यांमध्ये भाजपाविरोधातल्या विरोधी पक्षांच्या आघाडीवर सविस्तर चर्चा झाली. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही उद्या भेट घेणार आहेत.

अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीत आमचं सरकार आलं आणि काहीच दिवसांत केंद्र सरकारने आमच्या शक्ती हिरावल्या. आमच्या अधिकारांवर घाला घालणारा वटहुकूम काढला. परंतु आठ वर्ष आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढाई लढलो आणि आठ वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला. परंतु या निर्णयानंतर अवघ्या आठच दिवसात केंद्र सरकारने नवा अध्यादेश काढून आमची शक्ती हिरावली. हे लोक सुप्रीम कोर्टाला मानत नाहीत.

अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीतल्या जनतेच्या सरकारविरोधात वटहुकूम काढून भाजपाने हुकूमशाही सुरू केली आहे. राज्यसभेत या अध्यादेशासंदर्भातलं विधेयक मांडलं जाणार, तेव्हा शिवसेना (ठाकरे गट) याचा विरोध करेल. उद्धव ठाकरे यासाठी आमच्या बाजूने आहे. ते आमचं समर्थन करतील असं वचन उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिलं आहे. जर हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं नाही, तर २०२४ मध्ये देशात मोदींचं सरकार येणार नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले कि, सर्वोच्च न्यायालयाने निवडून आलेल्या दिल्लीतल्या आप सरकारला सर्व अधिकार दिले होते. परंतु, केंद्र सरकारने नवीन अध्यादेश काढून दिल्ली सरकारचे सर्व अधिकार राज्यपालांना दिले आहेत. हे लोक सुप्रीम कोर्टाचे आदेश मानत नाहीत. मोदी सरकारमधील मंत्र्यांनी, नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना घाणेरड्या शिव्या दिल्या. हे लोक न्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेविरोधात सोशल मीडियावर मोहीम राबवतात. यांचे लोक निवृत्त न्यायाधीशांना देशद्रोही म्हणतात. त्यांचा न्यायव्यवस्थेवरच विश्वास आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page