आषाढ महिन्याच्या अमावस्येला ‘दीप अमावस्या’ असं म्हटलं जातं. श्रावण महिना सुरु होण्याच्या एक दिवसापूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते. महाराष्ट्रात ही ‘गटारी अमावस्या’ (Gutari Amavasya) म्हणूनही ओळखले जाते.
हिंदू धर्मात अमावस्येला फार महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येचे महत्त्व आधिक आहे. आषाढ अमावस्येलाच (Gutari Amavasya) ‘दीप आमावस्या’ म्हणतात. कारण ही चातुर्मासातील पहिली अमावस्या तिथी आहे. यानंतर श्रावण महिना सुरू होतो. यंदा ‘दीप अमावस्या’ 4 ऑगस्टला आहे.
*गटारी अमावस्या 2024 शुभ मुहूर्त-*
आज ‘दीप अमावस्या’ आहे. अमावस्याचा प्रारंभ 3 ऑगस्ट 2024 दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी होत असून, अमावस्या तिथी समाप्ती 4 ऑगस्ट 2024 दुपारी 4 वाजून 42 मिनिटांनी होणार आहे. तिथीनुसार अमावस्या रविवार 4 ऑगस्ट या दिवशी साजरी केली जाणार आहे.
*आषाढ अमावस्येला पूजा पद्धती-*
अमावस्या तिथी महिन्यातून एकदा येते. हिंदू धर्मात अमावस्या तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. त्यामुळं अमावस्येला भगवान विष्णूची पूजा करणे खूप शुभ मानलं जातं. याशिवाय पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवशी तर्पणही केलं जातं. अमावस्या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं विशेष महत्त्व आहे. नदीत स्नान केल्यानंतर पितरांना नैवेद्य दाखवला जातो.
*आषाढ अमावस्येला हे काम करू नका-*
ज्योतिषशास्त्रात अमावस्येला रिक्त तिथी म्हणतात, म्हणजेच या तिथीला केलेल्या कामाचं फळ मिळत नाही. हा दिवस पितरांना समर्पित आहे, अशा स्थितीत कोणतेही शुभ कार्य करू नये. अमावस्येच्या दिवशी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी-विक्री टाळा आणि घरातील तापमानवाढ, मुंडन, शुभ कार्य करू नका, कारण यामुळं अशुभ परिणाम मिळतात.