ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.
▪️मेष :
आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. कार्यालयीन किंवा व्यापारी क्षेत्रातील अधिकारी वर्गाशी महत्वाची चर्चा होईल. सरकारी फायदा मिळण्याची शक्यता आहे. कामासाठी एखादा प्रवास घडेल. काम वाढेल. शारीरिक थकवा जाणवेल. आईकडून लाभ संभवतो.
▪️वृषभ :
आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील आणि भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास घडतील. एखाद्या प्रवासाने मन प्रसन्न झाले तरी सुद्धा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कामाचा व्याप वाढेल.
▪️मिथुन :
आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज नकारात्मक विचारांपासून दूर राहणं हितावह राहील. शक्यतो नवीन कार्य किंवा औषधोपचार आज सुरू करू नये. रागावम संयम ठेवला नाही तर एखाद्या अप्रिय प्रसंगास सामोरे जावे लागेल. खर्च जास्त झाल्यानं आर्थिक चणचण भासेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा.
▪️कर्क :
आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी आहे. समृद्ध जीवनशैली आणि मनोरंजक वृत्तीमुळं आज आपण आनंदी राहाल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. मान-प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखू शकाल.
▪️सिंह :
आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी बोलताना वाणीवर संयम ठेवावा. दैनंदिन कामात विघ्ने येतील. कार्यपूर्तीत अडचणी येतील. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी झाल्यानं नैराश्य येईल. आई विषयक चिंता राहील.
▪️कन्या :
आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज शक्यतो वाद आणि चर्चा यापासून दूर राहणं हितावह राहील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडचणी येतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्यानं मन आनंदित होईल. पोटाच्या तक्रारी वाढू शकतील. शेअर्स, सट्टे बाजारात गुंतवणूक करताना सावध राहावं.
▪️तूळ :
आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात हळवेपणा जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव जाणवेल. मानसिक तणाव सुद्धा असेल. धनाची तसेच कीर्तीची हानी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी राहील. जवळच्या नातलगांशी संघर्ष किंवा वाद झाल्यानं मनाला यातना होतील.
▪️वृश्चिक :
आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी आहे. नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. दिवसभर मन आनंदी राहील. भावंडांशी घराविषयी महत्वाची चर्चा कराल. आर्थिक लाभ संभवतात. नशिबाची साथ लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. मित्रांच्या सहवासामुळं मन आनंदित होईल. कामात यश मिळेल.
▪️धनू :
आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. वायफळ खर्च होतील. मनास मरगळ येईल. कुटुंबीयांशी गैरसमज झाल्याने मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. व्दिधा मनःस्थितिमुळं कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. दूर राहणार्या नातलगांशी संपर्क साधू शकाल. कामाचा व्याप वाढेल.
▪️मकर :
आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या सामाजिक कार्यात आपण सहभागी व्हाल. नोकरी – व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. मान-सन्मान होतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळाल्यानं आपण आनंददित व्हाल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. एखादा अपघात संभवतो. प्रकृती उत्तम राहील.
▪️कुंभ :
आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. शक्यतो कोर्ट-कचेरी पासून दूर राहा. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा. कुटुंबियांशी मतभेद होतील. एखादा अपघात संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. पैसा खर्च होईल.
▪️मीन :
आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज आपण कौटुंबिक आणि सामाजिक सोहळ्यात सहभागी व्हाल. मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या रम्य स्थळी सहलीसाठी जाऊ शकाल. प्रत्येक क्षेत्रात आपणाला फायदा होईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.