दिनांक 4 एप्रिल 2024 जाणून घेऊया आजच्या राशी भविष्य मधून या पाच राशींसाठी खूप खास असेल आजचा दिवस; वाचा राशी भविष्य…

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडं अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीनं काही नवीन मांडणी-सजावट याचा सुद्धा विचार कराल. कामात समाधान लाभेल. स्त्रीयांकडून एखादा सन्मान होईल. आईशी सुसंवाद साधू शकाल. निरूत्साहीपणा सोडून द्यावा लागेल.

▪️वृषभ :

आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल. एखादया रमणीय स्थळाला भेट देऊन आपले मन प्रसन्न होईल. दूरचे प्रवास संभवतात. दूरवरच्या मित्रांच्या शुभ बातम्या समजतील. परदेशी जाण्याची संधी लाभेल. व्यापारात आर्थिक लाभ संभवतो. आरोग्य मध्यम राहील.

▪️मिथुन :

आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्यानं प्रत्येक बाबतीत सावध राहावं लागेल. आज नवीन कामाची सुरुवात न करणं हितावह राहील. क्रोधामुळं काही अनिष्ट होणार नाही याकडं लक्ष द्यावं लागेल. आजारपणात नवीन उपचारास सुरवात न केल्यास उत्तम. आज खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. घरात किंवा कार्यालयात वाणीवर ताबा ठेवा. वाद टाळा, काही कारणानं खाण्या-पिण्याची आबाळ होऊ शकते. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल.

▪️कर्क :

आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह आणि मनोरंजनात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वाहन सौख्य लाभेल. प्रतिष्ठेस तडा जाऊ शकतो. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील.

▪️सिंह :

आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात अडचणी येतील. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू आणि प्रतिस्पर्ध्यांमुळं त्रास होईल. वरिष्ठांशी वाद संभवतात. स्त्रियांना माहेरहून एखादी अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज उदासीनता आणि साशंकता अधिक प्रमाणात राहिल्यानं मन उदास होईल. प्रकृती साधारण राहील. प्रयत्नांच्या मानाने यश कमीच मिळेल.

▪️कन्या :

आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज संतती विषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल. पोटाच्या तक्रारीमुळं यातना होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. अचानक खर्च उदभवतील. बोलताना बौद्धीक चर्चा पासून दूर राहणं हितावह राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. शेअर्स, लॉटरीत नुकसान संभवते.

▪️तूळ :

आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज मानसिक थकवा जाणवेल. आपण जास्त हळवे व्हाल. मनात उठणार्‍या विचार तरंगांमुळं त्रास होईल. आई आणि स्त्री विषयक चिंता सतावेल. आजचा दिवस प्रवासासाठी प्रतिकूल आहे. पाण्यापासून दूर राहणं हितावह राहील. झोप पूर्ण न झाल्यानं मानसिक ताण येईल. कौटुंबिक तसेच जमीन-जुमल्याच्या बाबतीत सावध राहावं लागेल.

▪️वृश्चिक :

आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज दिवसभर आपण आनंदित राहू शकाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. सहकार्‍यांकडून सौख्य आणि आनंद मिळेल. मित्र आणि नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आर्थिक फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. भावंडांकडून लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. स्नेह संबंध जुळतील. छोटे प्रवास होतील.

▪️धनू :

आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. काही गैरसमजामुळं निर्णयाप्रत जाणं अवघड होईल. मन दुःखी राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. कामात अपेक्षित यश न मिळाल्यानं मन निराश होईल. कामाचा व्याप वाढेल. अकारण खर्च वाढतील.

▪️मकर :

आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी- व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. शारीरिक दुखापतीची शक्यता असल्यानं सांभाळून राहा. मित्र परिवार आणि स्नेहीजनांचा सहवास घडल्यानं मानसिक शांती लाभेल.

▪️कुंभ :

आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आर्थिक व्यवहार तसेच जमीन – जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन न राहणे हितावह राहील. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करावी. आपल्या निर्णयाशी कुटुंबीय सहमत होणार नाहीत. इतरांच्या बाबींत हस्तक्षेप केल्यास काही नुकसान संभवते. संभ्रमावस्था व अचानक संकट ह्यांचा सामना करावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

▪️मीन :

आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज मित्रांकडून आपणाला लाभ होईल आणि त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र आणि वडीलधार्‍यांशी संपर्क साधू शकाल. एखाद्या रम्य स्थळी सहलीचे नियोजन कराल. नवे संबंध जुळतील आणि भविष्यात त्याच्यांकडून लाभ होईल. घरातून चांगली बातमी मिळेल. संततीकडून लाभ होईल. अचानक धनलाभ संभवतो.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page