दिनांक 3 नोव्हेंबर 2023 शुक्रवार जाणून घेऊया ‘या’ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक असेल; वाचा राशीभविष्य…

Spread the love

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 03 नोव्हेंबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

मेष :

चंद्र आज 03 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. नोकरी – व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. भावंडांशी सलोखा राहील. त्याचा फायदा मिळेल. स्त्रियांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.

वृषभ :

चंद्र आज 03 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. चर्चेत आपल्या फसव्या व्यवहारामुळे संघर्ष निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे.

मिथुन :

चंद्र आज 03 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र व आप्तांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल. दांपत्य जीवनात सुख – समाधान लाभेल. आर्थिक लाभ व नियोजन यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे.

कर्क :

चंद्र आज 03 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे मानसिक दृष्टया आपण अस्वस्थ राहाल. द्विधा मनःस्थिती राहिल्याने महत्वाचे निर्णय लांबणीवर टाका. कोणाशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकृती बिघडेल. कोर्ट – कचेरीतील कामे जपून करा. मानहानी व धनहानी होण्याची शक्यता आहे.

सिंह :

चंद्र आज 03 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल, पण मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल. वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळतील. घरात मंगल कार्ये ठरतील. मित्रांची भेट होईल व त्यांच्यापासून फायदा होईल. व्यापारवृद्धी होईल. नोकरदारांचे उत्पन्न वाढेल. बाहेर जाण्याचा बेत ठरवाल.

कन्या :

चंद्र आज 03 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आज नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्या बद्दल आत्मीयता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल. व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रांत पुढे जात राहतील. धन, मान – सन्मान वाढेल. सरकार कडून लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख शांती व सुसंवाद राहील. वसुली किंवा व्यावसायिक कामा निमित्त बाहेर जावे लागेल.

तूळ :

चंद्र आज 03 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज आपण बुद्धिवादी व साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. दूरचे प्रवास कराल. परदेशगमनाच्या संधी येतील व परदेशस्थ स्नेह्यांकडून बातम्या मिळतील. प्रकृती यथा तथाच राहील. संततीच्या समस्या मनात चिंता वाढवतील.

वृश्चिक:

चंद्र आज 03 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. उक्ती व कृती यांवर आज संयम ठेवावा लागेल. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. खाणे – पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल. अभ्यासासाठी आजचा दिवस चांगला आहे. चिंतन – मनन यात वेळ घालवाल. त्यामुळे मानसिक शांती मिळण्या बरोबरच व्याधी दूर राहतील.

धनू :

चंद्र आज 03 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. मेजवानी, सहल, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात रमून जाल. दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल. सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल. बौद्धिक, तार्किक विचार विनिमय होईल. भागीदारीत लाभ होईल.

मकर :

चंद्र आज 03 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आज व्यापार – व्यवसायात वाढ होईल. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी असल्याने आर्थिक देवाण – घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल. कार्यकर्ते तसेच आपल्यावर अवलंबीत लोकांचे सहकार्य मिळेल. मातृ घराण्याकडून चांगली बातमी समजेल. प्रतिस्पर्ध्याला पराजित कराल. मात्र फायद्याच्या गुंतागुंतीपासून सावध राहावे.

कुंभ :

चंद्र आज 03 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आज आपण संतती व स्वतःचे स्वास्थ्य ह्या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे ह्याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल. आज नव्या कामाची सुरूवात करु नका. प्रवासात अडचणी येतील, म्हणून शक्य असेल तर प्रवास स्थगित करावा.

मीन :

चंद्र आज 03 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज शारीरिक व मानसिक भीती निर्माण होईल. कुटुंबियांशी वाद – विवाद होतील. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनामुळे आपला उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. धन व कीर्ती ह्यांची हानी होईल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्याने पाण्यापासून दूर राहावे. स्थावर संपत्ती, वाहन इत्यादींच्या समस्या निर्माण होऊन आपली चिंता वाढेल

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page