दिनांक 2 फेब्रुवारी 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून ‘या’ राशीच्या लोकांना साडेसातीपासून मिळेल मुक्ती? वाचा राशी भविष्य…

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपल्यात तरतरीतपणा आणि उत्साह यांचा अभाव राहील. तसेच रागाचं प्रमाण वाढल्यानं काम बिघडण्याची शक्यता आहे. तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा. कार्यालयात अधिकारी, विरोधक आणि घरात कुटुंबीय यांच्याशी वादात न पडता शांत राहून दिवस घालवणं अधिक चांगले. एखाद्या मंगल कार्यास किंवा बाहेरगावी जाण्याचा प्रसंग येईल.

▪️वृषभ :

आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्यानं आपण निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल. खाण्या-पिण्यामुळं प्रकृती बिघडेल. नवीन काम सुरू करायला आजचा दिवस अनुकूल नाही. प्रवासात विघ्ने येतील. नोकरी – व्यवसायाच्या जागी कामाचा व्याप वाढल्यामुळं थकून जाल. आपणास मानसिक शांतता लाभण्यासाठी प्रयत्न करावं लागतील.

▪️मिथुन :

आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ आरामदायी आणि प्रसन्न वातावरणात होईल. पाहुणे आणि मित्रांच्या सहवासात मेजवानी, सहल, किंवा मनोरंजनाचा बेत ठरवाल. नवे कपडे, दागीने आणि वाहन खरेदी करू शकाल. मन आनंदानं भरून जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण राहील. सार्वजनिक जीवनात सन्मान मिळेल आणि लोकप्रियता वाढेल. व्यापारात भागीदारीमध्ये फायदा होईल. दांपत्यसुखाची प्राप्ती होईल.

▪️कर्क :

आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबियांना वेळ देऊ शकाल. त्यांच्या सहवासात घरात वेळ घालवाल. कार्यात सफलता मिळेल. नोकरदारांना नोकरीत लाभ होईल. सहकारी सहकार्य करतील. प्रकृती उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.

▪️सिंह :

आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण शारीरिक आणि मानसिकदृष्टया स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूपात व्यक्त होईल. साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल. प्रिय व्यक्तीचा सुखद सहवास लाभेल. संततीच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. हातून एखादे परोपकारी कृत्य घडेल. गूढ आणि रहस्यमय विद्येकडं कल होईल.

▪️कन्या :

आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. आरोग्य बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी पटणार नाही आणि त्यामुळं घरात शांतता नांदणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. पाण्यापासून सावध राहा. सबब जलाशयाच्या ठिकाणी दुस्साहस करू नका. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादी संबंधीच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी पूर्ण विचार करा.

▪️तूळ :

आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. सांप्रतकाळी धाडस करणं, एखादे काम हाती घेणं यांसाठी दिवस अनुकूल आहे. योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आपणास लाभदायक ठरेल. कुटुंबात भावंडांशी आपलेपणा आणि खेळीमेळीचे वातावरण असेल. लहानशा प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या बातम्या येतील.

▪️वृश्चिक :

आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी गैरसमज होणाची शक्यता आहे. मनात येणारे नकारात्मक विचार दूर सारावं लागतील. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. अनावश्यक खर्च उदभवू नयेत याकडं लक्ष द्यावं लागेल. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य आपणास बेचैन करेल.

▪️धनू :

आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपल्या कामात यश आणि आर्थिक लाभाची शक्यता आहे. एखाद्या मंगल कार्यास सहकुटुंब हजर राहाल. प्रवासाची शक्यता आहे. स्वकीयांची भेट आपणाला आनंदित करील. दांपत्य जीवनात जवळीक आणि गोडी निर्माण होईल. समाजात यश, कीर्ती वाढेल.

▪️मकर :

आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपण एखाद्या मंगल कार्यांत मग्न राहाल. परोपकारी कार्यांवर पैसा खर्च होईल. नातलग, संबंधित आणि कुटुंबीय यांच्याशी जपून बोला कारण आपलं बोलणं कोणाचं मन दुखावण्याची शक्यता आहे. खूप कष्ट आणि कमी यश यामुळं निराशा निर्माण होईल. आरोग्याकडं लक्ष द्या. दांपत्य जीवनात खटका उडेल.

▪️कुंभ :

आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपण एखाद्या नव्या कामाचं नियोजन किंवा सुरुवात करू शकाल. नोकरी-व्यवसायात लाभ प्राप्ती होईल. स्त्री मित्र आपल्या प्रगतीत मदत करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे. रमणीय स्थळी पर्यटनासाठी जाण्याचा बेत ठरवाल. समाजात प्रसिद्धी मिळेल. संततीची प्रगती होईल. पत्नी आणि संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.

▪️मीन :

आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्यानं तसेच वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्यानं आपणास अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. व्यापार वृद्धी होईल. वसुलीची रक्कम प्राप्त होईल. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. उत्पन्नाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मान किंवा उच्चपद मिळेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page