दिनांक 25 एप्रिल 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून ‘या’ राशीच्या लोकांना मिळेल कामात यश; वाचा राशी भविष्य…

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज आपणास सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक आणि दांपत्य जीवनात सौख्य लाभेल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. विचारात उग्रता आणि अधिकाराची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी प्राप्त होईल. समाधानि वृत्ती बाळगणं आवश्यक राहील. आजचा दिवस व्यापार्‍यांसाठी लाभदायी आहे.

▪️वृषभ :

आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळून नियोजित कामे ठरल्याप्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज प्रकृतीत सुधारणा जाणवेल. आईच्या घराण्याकडून चांगली बातमी समजेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. अडलेली कामे आज पूर्ण होतील.

▪️मिथुन :

आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम हाती घेऊ शकाल. पत्नी आणि संतती विषयी चिंता वाटून मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्यानं प्रकृती नरम-गरम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस आहे. शक्यतो वादविवाद टाळावेत. मतभेद संभवतात. मानहानी सुद्धा संभवते.

▪️कर्क :

आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज आपल्यात आनंद आणि स्फूर्ती ह्यांचा अभाव दिसून येईल. मन खिन्न होईल. छातीत दुखणं किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. पैसा खर्च होईल. जलाशयापासून दूर राहावं.

▪️सिंह :

आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. कामात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळं मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्र आणि स्नेही यांच्यासह एखाद्या रमणीय पर्यटन स्थळी हिंडण्या-फिरण्याचा आनंद घेऊ शकाल. प्रकृती सुद्धा एकदम उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. मनात उद्विग्नता येणार नाही. नशिबाची साथ मिळेल. नवे कार्य हाती घेण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.

▪️कन्या :

आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या मधुर वाणीचा इतरांच्या मनावर सकारात्मक प्रभाव होईल. घरगुती वातावरण चांगलं राहील. वाणीवर ताबा ठेवल्यानं वादविवाद होणार नाहीत. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहावं लागेल. मित्रांची भेट होईल. छोटासा प्रवास घडेल.

▪️तूळ :

आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास असल्याचं दिसून येईल. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. शारीरिक आणि मानसिक शांतता लाभेल. वस्त्रे, अलंकार, आनंद, उल्हास यासाठी खर्च होईल. वैचारिक वाढ होईल. रचनात्मक कार्यात मन रमेल.

▪️वृश्चिक :

आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक शैथिल्य आणि मानसिक चिंता यामुळं मन ग्रासून जाईल. वाहन चालवताना अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो आज शस्त्रक्रिया टाळावी. स्नेही आणि कुटुंबीयांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्ट-कचेरीच्या कामात सावध राहा किंवा शक्य असेल तर काम लांबणीवर टाका. आनंद-उल्हास यासाठी खर्च कराल.

▪️धनू :

आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. मित्र आणि परिवारासह पर्यटन स्थळी भटकण्याचा आनंद मिळेल. व्यापारात लाभदायी ठरणारा दिवस आहे. कुटुंबात सुख-शांती नांदेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळू शकेल.

▪️मकर :

आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. कुटुंब आणि संतती यांच्याविषयी आपणाला आनंद आणि समाधान होईल. स्नेही व मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. व्यापारात पैशाच्या वसुलीसाठी बाहेर जावं लागेल आणि ते फायदेशीर ठरेल. व्यवसायात धन व मान-प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो.

▪️कुंभ :

आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज प्रतिस्पर्ध्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक अस्वास्थ्य राहील. शैथिल्य व आळस राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीत चुका होतील. आनंद-मौजमजा यासाठी पैसा खर्च होईल. संततीविषयक काळजी राहील. विदेशातून सुखद बातमी ऐकिवात येईल.

▪️मीन :

आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक आणि मानसिक कष्टाची तयारी ठेवा. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. खर्च वाढेल. अवैध प्रवृतींमुळं अडचणीत याल. योग्य विचार आणि काम आपणास वाईट मार्गावर जाण्यापासून थोपवतील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page