दिनांक 24 नोवेंबर 2023 , शुक्रवार जाणून घेऊया ‘या’ राशीच्या व्यक्तींना मित्रांकडून लाभ होईल; वाचा राशीभविष्य….

Spread the love

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 24 नोव्हेंबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

▪️मेष :

24 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आज ”कमी वेळात अधिक लाभ” अशा एखाद्या योजनेत आपली फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या प्रकरणात अडकू नका. आज कोणाला जामीन राहू नका. आज मनाची एकाग्रता कमी राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक देवाण – घेवाणीत लक्ष द्यावे लागेल. एखादी दुर्घटना संभवते. दुपार नंतर मात्र खूप खुशीत राहाल. घरात सुख- शांतीचे वातावरण राहील. कटुंबात एखादे धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. एखादा प्रवास संभवतो. आजचा दिवस नवीन काम हाती घेण्यास अनुकूल आहे. अचानक धनलाभ संभवतो.

▪️वृषभ :

24 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आजचा दिवस व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिने शुभ फलदायी आहे. मित्र व वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल. नवे मित्र होतील व ती मैत्री दीर्घकाल टिकून राहील. संततीच्या प्रगतीमुळे मनाला आनंद मिळेल. प्रवास संभवतात. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आप्तांवर खर्च होईल. त्यांच्याशी मतभेद सुद्धा होतील. धार्मिक कार्यांवर खर्च होईल. स्वभाव उदासीन होईल. कोर्ट- कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. आध्यात्मिक बाबींमध्ये सक्रीय होऊन त्यात आनंद मिळवू शकाल.

▪️मिथुन :

24 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन झाल्याने आपला प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल व जुनी येणी वसूल होतील. वडील व वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. दुपार नंतर मित्रांकडून लाभ होईल. एखाद्या सामाजिक कार्यास हजेरी लावाल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.

▪️कर्क :

24 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज वरिष्ठांशी वाद होण्याच्या शक्यतेमुळे उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. दुपार नंतर मात्र व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामामुळे संतुष्ट राहतील. आर्थिक दृष्टया लाभ होईल.

▪️सिंह :

24 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आज वाद होण्याची शक्यता असल्याने संताप व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कृत्य घडण्याची शक्यता आहे. मानसिक व्यग्रता राहील. कुटुंबियांशी भांडणे होतील. शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. वरिष्ठ व प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वादविवाद करू नका. नकारात्मक विचारां पासून दूर राहा.

▪️कन्या :

24 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आज आपणास आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. सामाजिक मान – सन्मान होतील. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. करमणुकीमुळे दिवस आनंदात जाईल. व्यापारी येणी वसूल होतील. दुपार नंतर प्रकृती नरम गरम होईल. अचानक लाभ संभवतात.

▪️तूळ :

24 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. कोणतेही कार्य खंबीर मनाने व आत्मविश्वासाने पूर्ण कराल. मन शांत ठेवा. घरातील वातावरण आनंददायी व शांत राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कलावंतांना आजचा दिवस शुभ आहे. कार्यनैपुण्य आणि कलेची जाण प्रदर्शीत करण्याची संधी मिळेल. मनोरंजक वातावरणात आपण आनंदात असाल व आप्तेष्टांना त्यात सहभागी करून घ्याल. प्रत्येक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.

▪️वृश्चिक :

24 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस साहित्यिकांना अनुकूल आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. शेअर्स, लॉटरी यात लाभ होईल. खंबीर मन व आत्मविश्वास वाढेल. प्रकृती उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. तरीही प्रत्येक कार्य शांतपणे करावे लागेल. व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.

▪️धनू :

24 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आईच्या तब्बेतीत बिघाड व घरातील गढूळ वातावरण यामुळे आपल्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. आर्थीक नुकसान व मानहानी संभवते. दुपार नंतर मात्र मन विधायक कार्याकडे वळेल. प्रेमभावना वाढीस लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस शुभ आहे.

▪️मकर :

24 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा आहे. जोडीदाराशी संबंधातील गोडवा टिकून राहील. मित्रांसह एखाद्या सहलीचे आयोजन कराल. भावंडे व नातलगांशी चांगले संबंध राहतील. मान सम्मान वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. दुपार नंतर एखाद्या दुर्घटनेमुळे मनःस्वास्थ्य बिघडेल. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. व्यावसायिकांना व्यावसायिक चिंता भेडसावतील. घर किंवा स्थावर मालमत्ते संबंधीच्या कागदपत्रांवर विचारपूर्वक स्वाक्षरी करावी.

▪️कुंभ :

24 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच संतापावर व जिभेवर ताबा ठेवावा लागेल. त्यामुळे कोणाशी कटुता येणार नाही व मनातून नकारात्मक विचार दूर होतील. दुपार नंतर विचारात स्थैर्य येईल. सृजनशील व कलात्मक गोष्टींकडे आपला कल राहील. घरातील वातावरण सुख- समाधानाचे राहील. कार्यात यश मिळवू शकाल.

▪️मीन :

24 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्याने आपण उत्साहित राहाल. नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांसह वेळ आनंदात घालवाल. धार्मिक कार्यात खर्च होईल. प्रवास संभवतात. दुपार नंतर मात्र मनावर संयम ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. पैशाच्या देवाण- घेवाणीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page