दिनांक 21 मार्च 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून ‘या’ राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडं दुर्लक्ष करू नये ; जाणून घ्या १२ राशींचं राशी भविष्य…

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज आपण खूप संवेदनशील झाल्यानं कोणाचं बोलणं आपल्या भावना दुखावेल. आईच्या आरोग्याची काळजी राहील. स्थावर संपत्ती संबंधी कोणताही निर्णय घेणं योग्य ठरणार नाही. मानसिक तळमळ आणि शारीरिक अस्वास्थ्य राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्वाभिमान दुखावला जाईल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्त्री वर्गापासून जपून राहावं लागेल.

▪️वृषभ :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज शरीर आणि मन स्वस्थ आणि प्रफुल्लित राहील. कुटुंबियांशी घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. मित्रांसह प्रवासाचे नियोजन कराल. आर्थिक गोष्टींकडं अधिक लक्ष दिलं तर प्रत्येक कामात यश मिळेल. नशिबाची साथ लाभेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रियजनांचा सहवास आणि सार्वजनिक सन्मान मिळेल. व्यापारात वाढ होईल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.

▪️मिथुन :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन यशस्वी कराल. मिष्टान्नाची प्राप्ती होईल. विद्यार्जनाच्या दृष्टीनं विद्यार्थांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्नेही आणि मित्र परिवाराच्या भेटीनं आनंद होईल. व्यापारातील वातावरण आपणास अनुकूल राहील. उत्पन्नात वाढ होईल.

▪️कर्क :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज भेट वस्तू मिळतील. स्वादिष्ट भोजन आणि बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. मंगल प्रसंगांना हजेरी लावाल. आनंददायक प्रवास होतील. धनलाभ होईल. दांपत्य जीवनात जवळीक वाढेल.

▪️सिंह :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज जास्त भावनाशील राहिल्यानं आपणास शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. चुकीच्या वाद – विवादामुळं भांडण निर्माण होईल. कोर्ट – कचेरी प्रकरणात सावध राहावं लागेल. उक्ती आणि कृती यात संयम राखणं आवश्यक आहे. उत्पन्नाच्या मानाने खर्च अधिक होईल. कोणाचे गैरसमज होऊ नयेत याची काळजी घ्या.

▪️कन्या :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस आहे. व्यापार – व्यवसायाच्या विकासा बरोबरच उत्पन्न वाढेल. नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात सुख – शांती लाभेल. पत्नी, संतती, वडीलधारी यांचेकडून लाभ होईल. मित्रांसोबत रम्य पर्यटन कराल. स्त्री मित्र विशेष सहायक ठरतील. संतती कडून चांगल्या बातम्या मिळतील.

▪️तूळ :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत पगार वाढ व पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आईकडून लाभ होईल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कामाची स्तुती होऊन प्रेरणा सुद्धा मिळेल. सहकारी सहकार्य करतील. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील.

▪️वृश्चिक :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. थकवा व आळस यांमुळे स्फूर्तीची उणीव राहील. मनात गाढ चिंता सतत येत राहतील. नोकरी – व्यवसायात अडचणी येतील. वरिष्ठ अधिकार्‍यांशी वादविवाद टाळा. परदेश गमनाच्या संधी येतील. परदेशात वास्तव्यास असणार्‍या नातलगां कडून आनंददायी बातम्या मिळतील. संततीविषयक चिंता राहील.

▪️धनू :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपण वाणी व संताप यावर आवर घालावा अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळे प्रकृती खराब राहील. मानसिक तणाव जाणवेल. धन खर्च वाढेल. निषेधार्ह व अवैध कृत्य वाईट मार्गावर नेईल हे लक्षात ठेवा.

▪️मकर :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज आपल्या विचारात आणि व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपलं कुटुंबीय आणि मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. शरीर आणि मन प्रसन्नतेने भरेल. व्यवसाय वाढ होईल. दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. भागीदारीत लाभ होईल. सामाजिक जीवनात मान – प्रतिष्ठा वाढेल. प्रवासाची शक्यता आहे. भिन्नलिंगी व्यक्तीकडं आकर्षित व्हाल.

▪️कुंभ :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज केलेल्या कामात आपणाला यश, कीर्ती, सफलता मिळेल. कुटुंबात एकोपा राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.आपले विचार आणि व्यवहार यांत हळवेपणा राहील. नोकरीत सहकारी सहकार्य करतील. आईच्या घराण्याकडून लाभ होईल. कामासाठी पैसा खर्च होईल. विरोधक आणि प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.

▪️मीन :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपल्या अंगी असलेली सृजनात्मकता बाहेर पडून आपण साहित्य क्षेत्रात लेखन किंवा पठण कार्यात रूची घ्याल. हृदयाची कोमलता प्रियजनांस जवळ आणेल. स्वभावात हळवेपणा राहील. स्वास्थ्याच्या दृष्टीने दिवस मध्यम आहे. विद्यार्थी अभ्यासात कौशल्य दाखवतील. मानसिक संतुलन आणि बोलण्यावर संयम ठेवणं आवश्यक आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page