दिनांक 19 मार्च 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून ‘या’ राशींच्या व्यक्तींना आर्थिक नियोजन करता येईल यशस्वी ; जाणून घ्या आजचं राशीभविष्य…

Spread the love

कोणत्या राशींसाठी आजचा दिवस शुभ, ग्रहांची चाल कशी राहील, आजचा दिवस कसा राहील, तुमच्या नशिबाचे तारे काय सांगतात, जाणून घ्या या दैनिक राशीभविष्य.

▪️मेष :

आज अती विचारानं मनावर ताण येईल. मन हळवं होईल. वाद – विवाद होतील. आप्तेष्टांशी कटुता निर्माण होईल. एखादा मानहानीचा प्रसंग उद्भवेल. नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी येतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. एखाद्या स्त्रीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

▪️वृषभ :

सुरुवातीस काही अडचणी निर्माण झाल्या तरी आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येईल. मित्र आणि स्नेहीजनांच्या सहवासानं आनंदित व्हाल. व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. धनसंचय होऊ शकेल.

▪️मिथुन :

आज आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपारनंतर आर्थिक नियोजनात काही चूक झाली असल्याचं वाटेल. आर्थिक देवाण – घेवाणीच्या व्यवहारात सावध राहावं लागेल. नोकरीत सहकाऱ्यांचं अपेक्षित सहकार्य लाभेल.

▪️कर्क :

आज प्राप्तीपेक्षा खर्चात वाढ होत असल्याचं जाणवेल. नेत्र विकार संभवतात. मानसिक चिंता वाढतील. आपल्या एखाद्या वक्तव्यानं अडचणीत येऊ शकाल. दुपारनंतर समस्या कमी होऊ लागतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. मनातील नकारात्मक विचार काढून टाकल्यास, कौटुंबिक वातावरण आनंदी होऊ शकेल. आर्थिक लाभ संभवतात.

▪️सिंह :

आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. आजचा दिवस आरोग्यास चांगला नाही. काही ना काही कारणानं मन चिंतीत होईल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होईल. दुपारनंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होईल. मन शांत होईल. कुटुंबियांच्या सहवासात रात्री भोजन घेऊ शकाल. आरोग्यात सुधारणा होईल. खर्च नियंत्रित ठेवावे लागतील.

▪️कन्या :

आज सकाळची वेळ आपणास आनंददायी आणि लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. प्रकृतीच्या तक्रारी उद्भवतील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.

▪️तूळ :

आज शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी – व्यवसायात उत्साहित होऊन कामं कराल. नोकरीत पदोन्नती संभवते. शासकीय कामं सहजपणे होऊ शकतील. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. धनप्राप्ती संभवते. पत्नी आणि संतती संबंधित लाभ होतील. मित्रांच्या सहवासानं आनंद होईल. प्राप्तीत वाढ संभवते.

▪️वृश्चिक :

आज विरोधक आणि प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. नोकरी – व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल राहील. संततीशी मतभेद संभवतात. दुपारनंतर सर्वांचा कल आपल्या विरुद्ध होईल. संततीची चिंता वाटेल. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. शासकीय कामं पूर्ण होतील. नोकरी – व्यवसायात अनुकूलता लाभेल.

▪️धनू :

आज आपल्या संतापामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैनी वाढेल. नोकरी – व्यवसायात सहकाऱ्यांचं अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. संततीच्या समस्येमुळे आपण चिंतीत व्हाल. प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांच्याशी वाद संभवतात. नवीन कार्यारंभात अडचणी निर्माण होतील. महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही.

▪️मकर :

आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरण्यास आणि मेजवानीस जाऊन आपण आनंदित व्हाल. वाहनसौख्य आणि मान – सन्मान संभवतात. दुपारनंतर मात्र शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल. काही ना काही कारणानं संताप वाढेल आणि त्यामुळे कुटुंबीय आणि सहकारी यांचं मन दुखावेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील.

▪️कुंभ :

आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. सामाजिक मान – सन्मानात वाढ होईल. दुपारनंतर एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात आप्तेष्टांना सहभागी करून घेऊ शकाल.

▪️मीन :

आजचा दिवस आनंददायी आहे. मित्रांच्या आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. दुपारनंतर एखादा आर्थिक लाभ संभवतो. काही कारणानं आपल्यातील रागीटपणा वाढेल. अशा वेळेस आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. विरोधकांवर मात करू शकाल. अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण होतील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page