दिनांक 19 एप्रिल 2024 जाणून घेऊया आजच्या राशीभविष्य मधून आज कुणाला मिळणार शुभफल, कुणाला लागणार चिंता? वाचा राशी भविष्य ….

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. आज आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवणं हितावह राहील. शारीरिक आणि मानसिक शैथिल्य जाणवेल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळू शकणार नाही. संततीची काळजी सतावेल. कामाच्या धावपळीमुळं कुटुंबियांना योग्य तितका वेळ आपण देऊ शकणार नाही. विघातक विचार, कृती आणि नियोजन यापासून दूर राहावं. पोटदुखीचा त्रास संभवतो. शक्यतो आज प्रवास टाळावा. सरकारी कामात यश मिळेल.

▪️वृषभ :

चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वासानं आपली कामे कराल. कामात अपेक्षित यश मिळेल. स्त्रीयांना माहेरहून लाभदायी बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात यश मिळेल. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. संततीसाठी खर्च करावा लागेल.

▪️मिथुन :

चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. सरकारकडून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. स्नेही वा शेजार्‍यांशी गैरसमज झाले असल्यास ते दूर होतील. अचानकपणे वैचारिक बदल होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची गरज भासेल.

▪️कर्क :

चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आज नकारात्मक दृष्टिकोनातून काही व्यवहार होतील. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही. कुटुंबियांशी गैरसमज होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. अवैध बाबीपासून दूर राहावं. आज खर्चाचे प्रमाण वाढेल.

▪️सिंह :

चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज आपला आत्मविश्वास दुणावेल. कोणतेही काम करण्याविषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. बोलणं-वागणं संयमित ठेवावं लागेल. रागाचं प्रमाण वाढेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

▪️कन्या :

चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा आणि मानसिक चिंता राहील. मित्र आणि स्वकीयांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील. स्वभावात उग्रपणा आणि संतापाचे प्रमाण वाढेल. मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. अचानकपणे खर्च वाढतील. शक्यतो वाद व संघर्ष यापासून दूर राहावं.

▪️तूळ :

चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध क्षेत्रांतून लाभ झाल्यानं आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल आणि त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल. प्रवास अथवा सहलीस जाण्यासाठी दिवस अनुकूल आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येईल.

▪️वृश्चिक :

चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. मान मरातब वाढेल. नोकरीत बढती मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. संततीच्या प्रगतीमुळे आनंदित व्हाल.

▪️धनू :

चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आज प्रकृती यथा तथाच राहील. शारीरिकदृष्टया आळस आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता आणि व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. नकारात्मक विचार दूर सारावं लागतील. कोणत्याही कार्याचं नियोजन जपून करावं. वरिष्ठांशी संघर्ष संभवतो. प्रतिस्पर्धी आणि विरोधकांशी दोन हात करावं लागतील.

▪️मकर :

चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील आणि त्यामुळं व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावं लागेल. क्रोध नियंत्रित ठेवावा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करावी लागेल. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. भागीदारांशी मतभेद संभवतात. सरकारी क्षेत्रांशी संबंधित कामात आपल्या क्षमतेचा योग्य उपयोग कराल.

▪️कुंभ :

चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. आज खंबीर मन आणि दृढ आत्मविश्वासानं आपण प्रत्येक काम कराल. प्रवास-सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद आणि नवी वस्त्र परिधान करण्याचं प्रसंग येतील. भागीदारांकडून लाभ होतील. वाहनसुख मिळेल.

▪️मीन :

चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल आणि आत्मविश्वास उत्तम राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातून अती उत्साह काढून टाका. वाणीवर नियंत्रण ठेवावं लागेल. व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरून एखादी चांगली बातमी मिळेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page