दिनांक 13 मे 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून ‘या’ राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडं दुर्लक्ष करू नये; जाणून घ्या १२ राशींचं राशी भविष्य…

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल. आज आपल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. घर, जमीन इत्यादींशी संबंधित व्यवहार शक्यतो आज करू नयेत. मानसिक उदवेग दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावं. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. एखाद्या अपघाताची शक्यता असल्यानं जलाशयापासून दूर राहावं. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे.

▪️वृषभ :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज आपण अती संवेदनशीलतेमुळं आणि भावूक विचारांमुळं खूप हळवे व्हाल. आपली आणि इतरांविषयीची काळजी दूर झाल्यामुळं मनाला दिलासा मिळेल. कल्पनाशक्ति आणि सृजनशीलतेने काम कराल. कुटुंबीय आणि मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. अचानकपणे प्रवास करावा लागेल. पैशाविषयी दक्ष राहून आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.

▪️मिथुन :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज नातलग आणि मित्रांशी संवाद साधल्यानं आपण आनंदित व्हाल. सुरूवातीस आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. पण नंतर सहजपणे ते काम पार पाडू शकाल. महत्वाच्या कामाची सुरुवात उशीरा होईल पण नंतर मात्र सहजगत्या ती पार पडतील. त्यामुळं मनःशांती अनुभवू शकाल. नोकरी-व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल.

▪️कर्क :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपल्या मनात प्रेमालापाचे तरंग उमटतील. दिवसभर त्याच मनःस्थितीत आपण राहाल. मित्र, स्वकीय आणि संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील. त्यांच्यासह आपण आपला दिवस आनंदात घालवाल. प्रवास, मनपसंत भोजन आणि प्रिय व्यक्तीचा सहवास यामुळं प्रफुल्लित राहाल. पत्नीच्या सहवासात मन प्रसन्न राहील.

▪️सिंह :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज कोर्ट-कचेरीच्या प्रश्नात सावध राहावे लागेल. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळं हातून काही अवैध कृत्य घडण्याची शक्यता आहे. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. उक्ती आणि कृती यात समतोल साधावा लागेल. विदेशातून एखादी आनंददायी बातमी येईल. कायदेशीर गोष्टींचा निर्णय विचार पूर्वक घ्यावा.

▪️कन्या :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. मित्रांसह एखादा आनंददायी प्रवास होईल. दांपत्य जीवनात जादा जवळीक निर्माण होईल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यापारातील पैसे मिळविण्यासाठी प्रवास करावा लागेल. अविवाहितांना जोडीदाराच्या शोध मोहीमेत यश मिळेल.

▪️तूळ :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज आपणाला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. मनात भावनात्मकता वाढेल. आईच्या घराण्याकडून फायदा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जमीन आणि मालमत्तेचे व्यवहार यशस्वीपणे करू शकाल. आजचा दिवस व्यवसायात यश प्राप्तीचा आहे.

▪️वृश्चिक :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. लेखन-साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर नाराज होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. संततीशी मतभेद होतील. प्रवासाची शक्यता आहे. पैसा खर्च होईल.

▪️धनू :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपणास खाण्या-पिण्याकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. कामात यश मिळण्यास विलंब झाल्यानं नैराश्य येईल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. शक्यतो आज नवे काम हाती घेऊ नये. प्रकृती भिघडण्याची शक्यता आहे. आपल्या बोलण्यावर संयम ठेवाव लागेल. खर्चात वाढ होईल.

▪️मकर :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मध्ये वाढ होईल. त्यामुळं आर्थिक स्तर मजबूत होईल. मान, प्रतिष्ठा वाढेल. एखादा प्रवास संभवतो.

▪️कुंभ :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी आहे. सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळाल्याने प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. स्त्रीयांना माहेरहून अनेक चांगल्या बातम्या मिळतील. घरात उत्साहाचं वातावरण राहील. नोकरीत सुद्धा सहकारी उत्तम सहकार्य करतील. शरीर आणि मन प्रसन्न राहील. कौटुंबिक वातावरण सुख-शांतीचे राहील.

▪️मीन :

आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपली सृजनशक्ती अधिकच वाढेल. कल्पनाशक्तीमुळं आज आपण साहित्य विश्वाची सफर कराल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. स्वभाव विशेष भावनाशील होईल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page