दिनांक 13 मार्च 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून कसा असेल तुमचा आजचा दिवस?; वाचा राशी भविष्य…

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपले प्रत्येक काम उत्साह आणि आवेश यांनी पूर्णतः भरलेले असल्याचा अनुभव आपणास येईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. मित्र आणि स्नेही यांच्यासह आनंदात वेळ घालवाल. आईकडून लाभ होईल. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ, रुचकर भोजन आणि भेटवस्तू मिळाल्यानं आपला आनंद वाढेल.

▪️वृषभ :

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज रागाची आणि निराशेची भावना मनात पसरेल. प्रकृती साथ देणार नाही. परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचं कारण बनू शकेल. परिश्रम वाया जात आहेत असं वाटेल. गैरसमजा पासून जपून राहावं लागेल.

▪️मिथुन :

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी – व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. उच्च पदाधिकारी आपल्या कामाची प्रशंसा करतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. स्त्री स्नेह्यांकडून विशेष लाभ होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनात माधुर्याचा आनंद घ्याल. संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील.

▪️कर्क :

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनानं आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आई तसेच इतर कुटुंबीय याच्याशी चांगले संबंध राहतील. मान – प्रतिष्ठा यात वाढ झाल्यानं आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. सरकारी कामात अनुकूलता लाभेल.

▪️सिंह :

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज आळस, थकवा आपल्या कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारीमुळं अस्वस्थता अनुभवाल. नोकरी – व्यवसायात विघ्न संतोषी लोकांमुळं प्रगतीत अडथळा येईल. वरिष्ठांशी मतभेद होतील. रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मांगलिक कार्य किंवा प्रवास यामुळं मनाची अशांती दूर होईल.

▪️कन्या :

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज ‘मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळं मतभेद होण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. नवीन कार्यारंभ लांबणीवर टाका. जलाशया पासून दूर राहा. खर्च खूप होईल. गूढ विद्या आणि रहस्य यांची गोडी लागेल.

▪️तूळ :

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज दैनंदिन कामाच्या व्यापातून जरा हलकं वाटावं म्हणून आपण मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटन याची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. भिन्नालिंगी किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळं आपणास खूप आनंद होईल. नवीन वस्त्रालंकारांची खरेदी किंवा परिधान करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक मान – सन्मान प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदाराच्या प्रेमाची उब आणि सहवास यामुळं आपण आनंदित व्हाल.

▪️वृश्चिक :

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदाने भरलेले असेल. शरीरात चैतन्य आणि उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी तसेच गुप्त शत्रू यांच्यावर आपण मात करू शकाल. कामात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. मित्र – मैत्रिणींचा सहवास तसेच प्रणयालापामुळं आपला आनंद व्दिगुणित होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतीत. प्रकृतीत सुधारणा होईल.

▪️धनू :

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज शक्यतो प्रवासाचा बेत स्थगित ठेवावा. कार्यातील अपयश मनात नैराश्य निर्माण करील आणि त्यामुळं संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्यास गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. पोटाच्या तक्रारीनं हैराण व्हाल. वाद – विवाद किंवा चर्चा यामुळं समस्या निर्माण होईल. संततीची काळजी वाटेल. प्रेमीजनांना प्रेमालापासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. धनप्राप्ती होईल.

▪️मकर :

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव असल्यानं अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्यानं मन खिन्न होईल. वेळेवर भोजन आणि शांत झोप मिळणार नाही. स्त्रीवर्गाकडून काही नुकसान होईल किंवा काही कारणानं त्यांच्याशी मतभेद होतील. धन, खर्च आणि अपयश यापासून सांभाळून राहावं लागेल.

▪️कुंभ :

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज आपणास चिंतामुक्त झाल्यानं जरा चांगले वाटेल. उत्साह वाढेल. वडील आणि मित्राकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. स्नेहसंमेलन किंवा प्रवासाच्या माध्यमातून कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. दांपत्य जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. आर्थिक लाभ आणि सामाजिक मान – प्रतिष्ठा मिळेल.

▪️मीन :

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपणास बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. रागामुळं एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील. विशेषतः डोळ्यांकडं लक्ष द्यावं लागेल. कुटुंबीय आणि प्रियजन यांच्याशी मतभेद संभवतात. विनाकारण खर्च होतील. आपल्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव होईल. खाण्या – पिण्यावर संयम ठेवावा लागेल. एकंदरीत आजचा दिवस विचार पूर्वक वागण्याचा आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page