दिनांक 12 एप्रिल 2024 जाणून घेऊया आजच्या राशी भविष्य मध्ये ‘या’ दोन राशीच्या लोकांना मिळेल शनिपासून मुक्ती; वाचा राशी भविष्य….

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज समाधानी वृत्ती अंगीकारल्यामुळं कोणाशी संघर्ष होणार नाही आणि त्यामुळं आपण समोरची व्यक्ती असे दोघांचेही हित जपले जाईल. लेखक आणि कलाकारांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढतील. त्यामुळं उत्साह कमी होईल. हळवेपणा वाढेल. मित्रांसमवेत प्रवासाचे बेत आखाल. अर्थविषयक कामे कराल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल.

▪️वृषभ :

आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. धनलाभ संभवतो. शारीरिक आणि मानसिक दृष्टया आपण उत्साहित राहाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. दुपारनंतर व्यावहारिक निर्णय घेण्यात अडचणी येतील आणि त्यामुळं आलेली एखादी संधी हातून निसटेल. आपल्या हटवादीपणामुळं इतरांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. शक्यतो नवे कार्य दुपारपूर्वी पूर्ण करा. भावंडांशी आपुलकी वाढल्याने अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल.

▪️मिथुन :

आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील. शारीरिक अस्वास्थ्य आणि मानसिक व्यग्रता जाणवेल. दुपारनंतर कामाचा उत्साह वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. आत्मविश्वास वाढेल. मनोरंजनावर खर्च कराल.

▪️कर्क :

आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी आहे. एखाद्या सहलीचा बेत आखू शकाल. दुपारनंतर मात्र शारीरिक, मानसिक अस्वस्थता जाणवेल. डोळ्यांच्या विकाराचा त्रास सतावेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल. एखादा अपघात संभवतो.

▪️सिंह :

आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. मित्र आणि स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. नवीन ओळखींचा भविष्यात व्यापारासाठी लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीय, मित्रांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. प्राप्तीत वाढ होईल. छोटा पण आनंददायी प्रवास होईल.

▪️कन्या :

आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज आपणास आपल्या व्यवसायात धनलाभ होईल. दूरवरचे प्रवास करू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. दुपारनंतर नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दिवसभर मनात सुखा- समाधानाची भावना राहील. नोकरीत मिळालेल्या बढतीमुळे लाभ होईल. सामाजिक मान – सन्मान मिळाल्यानं मन प्रसन्न होईल.

▪️तूळ :

आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आळस आणि कामाचा व्याप यामुळं मन व्याकुळ होईल. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीनं बाहेरील पदार्थ खाऊ नका. प्रवासात अडचणी येतील. पण दुपारनंतर मात्र परदेशस्थ मित्र व संबंधितांकडून काही चांगली बातमी आल्याने आपला आनंद द्विगुणित होईल. नवीन कार्यारंभाच्या दृष्टीने पण आजचा दिवस उत्साह वर्धक आहे. परदेशगमनाचे योग आहेत. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे.

▪️वृश्चिक :

आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात सुख व समाधान प्राप्त होईल. आप्तांसह सामाजिक समारंभात सहभागी होऊ शकाल. एखादा प्रवास संभवतो. दुपारनंतर आरोग्य विषयक तक्रारी उदभवतील. आहाराकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रवासात त्रास संभवतो.

▪️धनू :

आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगलं नसतानाही प्रलंबित कामे आपण पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आप्तेष्टांशी जवळीक वाढेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगता येईल. सामाजिक कार्यात यश प्राप्ती होईल. व्यवसाय वृद्धी होईल.

▪️मकर :

आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आपल्या वक्तृत्व शैलीने इतरांना प्रभावित कराल. गोड बोलून नवीन संबंध प्रस्थापित करू शकाल. आर्थिक नियोजनात यशस्वी व्हाल. नोकरीत सर्वांचे सहकार्य मिळवू शकाल. दुपारनंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कामे पूर्ण होऊ शकतील. एकंदरीत आजचा दिवस आनंददायी ठरेल.

▪️कुंभ :

आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चवथा स्थानी आहे. विद्यार्थी, कलाकार व खेळाडू ह्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. पिता व शासनाकडून काही लाभ होऊ शकेल. खंबीर मनोबलामुळं कार्यपूर्ती होण्यात कोणतीही आडकाठी येणार नाही. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील, शक्यतो बाहेरचे खाणं- पिणं टाळा. लेखन- वाचन यांत गोडी वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.

▪️मीन :

आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस काल्पनिक विश्वात घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा बेत ठरवू शकाल. दैनंदिन कामे आत्मविश्वास आणि एकाग्रचित्तानं पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासाच्या दृष्टीनं आजचा दिवस अनुकूल आहे. संततीसाठी अनुकूल दिवस. पित्याकडून लाभ होईल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page