
लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यावेळी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट शेवटचा सामना खेळला गेला.
त्यानंतर तब्बल १२८ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. दरम्यान, २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचे सामने कधी आणि कुठे खेळवण्यात येतील, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
लॉस एंजेलिस येथे खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रिकेट स्पर्धेत पुरुष आणि महिला असे प्रत्येकी ६ संघ सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत १२ पूर्ण सदस्य आहेत, ज्यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. परंतु, ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या निकषांवर सहा संघाची निवडण्यात येतील, हे लवकरच स्पष्ट केले जाईल.

२०२८ च्या ऑलिम्पिकमधील क्रिकेट सामने लॉस एंजेलिसपासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या पोमेना शहरातील फेअरग्राउंड्स स्टेडियममध्ये खेळले जातील. या स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांना १२ जुलै २०२५ पासून सुरुवात होईल. त्यानंतर २० आणि २९ जुलैला पदकांसाठी संघ आमने- सामने येतील. महत्त्वाचे म्हणजे, एका दिवशी फक्त दोन सामने खेळवले जातील. तसेच १४ जुलै आणि २१ जुलै २०२८ रोजी एकही क्रिकेट सामना खेळवला जाणार नाही. महिला आणि पुरुष गटात कोणते २ संघ सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी होतात, हे पाहणे मनोरंजक ठरेल.
भारतीय पुरुष आणि महिला संघ पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार म्हणून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतील.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने २०२८ च्या ऑलिम्पिकसाठी पाच नवीन खेळांना मान्यता दिली, यामध्ये क्रिकेट तसेच बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश यांचा समावेश आहे.
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर