▪️ भारत बायोटेकची नाकावाटे दिली जाणारी कोरोना व्हॅक्सिन लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविय आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत ही लस लाँच करण्यात आली.
▪️ जगात सर्वप्रथम भारतानेच नोजल व्हॅक्सीनला परवानगी दिली आहे. आता नाकात स्प्रे करून कोरोनाविरुध्द वॅक्सीनेशन केलं जाणार आहे. त्यामुळे इंजेक्शनची भीती वाटणारे लोकही हे व्हॅक्सीन सहज घेऊ शकतात आणि यासाठी फार तज्ज्ञ लोकांचीही आवश्यकता भासणार नाही. यामुळे व्हॅक्सिनेशनची गती वाढेल. शिवाय व्हायरस शरीरात जाण्यापासून रोखेल आणि आजारपण येण्यापासूनही वाचवेल. यामुळे आरटीपीसीआर फॉल्स पॉझिटीव्ह होण्याचे केसेस कमी होतील असा विश्वास वर्तवण्यात आला आहे.
▪️ भारत बायोटेकची ही नोजल व्हॅक्सिन सरकारला ३२५ रुपये प्रतिडोसने उपलब्ध होईल. तर खाजगी रुग्णालयांमध्ये याची किंमत ८०० रुपये असेल. या व्हॅक्सिनचे दोन खुराक २८ दिवसांच्या अंतराने घेता येणार आहेत. कोविन वेबसाईटवर ही नोजल व्हॅक्सिन बुक करता येईल.