मंडणगड (प्रतिनिधी) : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या एन. एस. एस. व सांस्कृतिक विभागाच्यावतीने ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. सदर दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव होते. यावेळी संस्थेचे संचालक श्री. आदेश मर्चंडे, श्री. संतोष चव्हाण, श्री. वैभव कोकाटे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, एन. एस. एस. कार्यक्रमाधिकारी डॉ.शामराव वाघमारे, डॉ. महेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. डॉ. शामराव वाघमारे यांनी आपल्या प्रस्ताविकपर भाषणात कार्यक्रम आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर 26/11 च्या दशहतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी बांधवांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. राहुल जाधव म्हणाले की, समाजवादी व धर्मनिरपेक्षतेने वाटचाल करणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. याचे एकमेव कारण म्हणजे संविधान होय. जगातील मोठी लोकशाही असलेला भारत हा एकमेव देश असून स्वातंत्र्य, समता, बंधुता ही भारतीय संविधानाची मूलभूत तत्त्वे आहेत. संविधानाने आपणांस मूलभूत हक्क आणि अधिकार दिले आहेत, तसेच मूलभूत कर्तव्यांची जाणीवसुध्दा करुन दिली आहे. म्हणून सर्व भारतीयांच्या दृष्टिने संविधानाचा गौरव करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहक वाचन करण्यात आले. त्यानंतर संविधानवर विद्याथ्र्यांनी लिहिलेल्या विविध पोस्टरचे फीत कापून प्रकाशन संस्थेचे संचालक श्री. वैभव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यसाठी प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांच्या मार्गदर्षनाखाली महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे, डॉ. महेश कुलकर्णी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शामराव वाघमारे यांनी तर आभार डॉ. महेश कुलकर्णी यांनी मानले.
————–
फोटो : कार्यक्रमामध्ये संविधान उदेद्शिकेचे सामुहिक वाचन करताना उपस्थित
संस्था प्रतिनिधी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग….
संविधान पोस्टरचे प्रकाशन करताना संचालक श्री. वैभव कोकाटे, सोबत उपस्थित मान्यवर…