रत्नागिरी प्रतिनिधी- “२०१४ पूर्वी होणारे बॉम्बस्फोट, आतंकवादी संघटनांकडून होणाऱ्या समाजविघातक घटना रोखण्याचे काम करण्याची हिंमत आमच्यात आहे. आम्ही वेळोवेळी ते सिद्ध केले आहे त्यामुळे देशात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाली आहे. हीच तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचे नैतिक दायित्व पार पाडणाऱ्या मोदी सरकारला आणि मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेलाच खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्याचा अधिकार आहे.” अ भाजपाचे राष्ट्रीयसे महामंत्री श्री. विनोद तावडे यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले.
🔹️ते पुढे म्हणाले…
▪️”मतदान सहानुभूतीवर होत नाही. मतदान होते ते राष्ट्रनिर्माण आणि विकासाच्या प्रवाहात योगदान देण्याच्या क्षमतेवर. विरोधी बाकावर बसणाऱ्या कोण्याही नेत्यामध्ये अशी क्षमता नाही हे सर्वश्रुत आहे. त्यातही विरोधी बाकावर बसण्यासाठी एखाद्या नेत्याला निवडून देण्यापेक्षा सत्तेचा लाभ जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी दादासाहेब राणेयांच्यासारख्या कार्यक्षम नेत्याला जनता निवडून देईल हा आम्हाला विश्वास आहे.”
🔹️”देशभर चाललेल्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्री कार्यक्रमावर आधारित आत्तापर्यंत झालेल्या कामावर जनता समाधानी आहे आणि जनतेलाही माहीत आहे ‘आयेगा तो मोदीही’. पण असे म्हणून चालणार नाही. मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडून दादासाहेबांना म्हणजेच मोदीजींना समर्थन द्या. त्यानंतर तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न आणि तुमच्या गरजांचा भार पेलण्यास मोदी सरकार ३.० तत्पर योगदान देईल याची मी ग्वाही देतो.” असा विश्वास त्यांनी यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांना देत ७ मे रोजी मतदानहोईपर्यंत सजग राहण्याचा सल्ला दिला.
▪️यावेळी मंचावर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-रिपाई-मनसे व अन्य मित्रपक्षांचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणातून राणे साहेबांच्या माध्यमातून मोदीजींना कोकणचा शिलेदार देण्याचा संकल्प उद्धृत केला.
🔹️काँग्रेसने ८० वेळा संविधान बदलले : विनोद तावडे
▪️दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे उमेदवार म्हणतात की, गोव्याला भारतीय संविधान लागू करू नये. कर्नाटकातही अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. गोव्यातील काँग्रेस उमेदवार म्हणतात की, राहुल गांधी यांच्याशी बोलून त्यांची अनुमती घेऊन विधान केले. दुसरीकडे भाजपाला संविधान बदलायचे आहे. म्हणून ४०० पारचा नारा दिला जात आहे, असा दावा राहुल गांधी करतात. परंतु, काँग्रेसने आतापर्यंत ८० वेळा संविधान बदलले आहे, असा पलटवार भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला.रत्नागीरी येथील पत्रकार परिषदेत केला यावेळी लोकसभा सहप्रभारी बाळासाहेब माने, माजी जिल्हाध्यक्ष दिलीप पटवर्धन, सचिन वहाळकर उपस्थित होते.
▪️यावेळी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, भाजपा आणि मोदी सरकारने संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी संविधानाची प्रत समोर ठेवून भाजपाने संकल्पपत्र घोषित केले. संविधानात बदल करण्याचे भाजपाच्या सुतराम डोक्यात नाही. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवारच अशा प्रकारची भाषा करत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्यास काही मिळाले नाही की, विरोधकांकडून विशेषतः काँग्रेसकडून अशी विधाने होतात, या शब्दांत विनोद तावडे यांनी काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला.
🔹️आपल्या राज्याची प्रगती कशात आहे याचा विचार व्हायला हवा
▪️महाराष्ट्राच्या जनतेला मोदी सरकारमधून काय मिळाले हा मुद्दा महत्त्वाचा आहे. करवाटपात महाराष्ट्राला मिळालेला अधिकचा वाटा, अनुदानात मिळालेली अधिकची रक्कम हे महाराष्ट्राला मिळाले. ११ हजार ७११ कोटी रुपये बिनव्याजी कर्ज केंद्राने महाराष्ट्राला दिले. मोदी सरकारकडून राज्याला काय मिळाले याचा विचार होणे गरजेचे आहे. राज्याला २५३ टक्के अनुदानाच्या रूपाने आले याचा जनतेने विचार करायला हवा. आपल्या राज्याची प्रगती कशात आहे याचा विचार व्हायला हवा, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले.
▪️”दरम्यान, काँग्रेस एका बाजूला रोजगार नाही, असे म्हणत आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपाने पंतप्रधान आवास योजनेतून चार कोटी घरे बांधली. ही घरे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खिशातून बांधली नाहीत. त्यासाठी लागलेल्या साहित्यात हजारो व लाखो लोकांना रोजगार मिळाला.
▪️”पीएम आवासमध्ये २७ लाख घरे महाराष्ट्राला दिली, शौचालय बांधली आहे. आयुष्यमान भारत योजनेत कार्ड दिले आहे, अन्नधान्य दिले जात आहे. तसेच पहिल्या टप्प्यात भाजपाला अपेक्षित मतदान झाले आहे. आम्ही चांगल्या जागा मिळवू. लोकसभेचा राज्यात जो प्रचार सुरू आहे तो राज्याच्या हितासाठी अपेक्षित नाही. कोण नाच्या म्हणतो, कोणी काही म्हणतो हे शोभनीय नाही. अशा राजकीय स्तरावर जाऊन प्रचार करने मनाला वेदना देणारे आहे, अशी खंत विनोद तावडे यांनी बोलून दाखवली.