रत्नागिरी :- तालुक्यातील चिंचखरी येथून कॉलेज तरुणी बेपत्ता

Spread the love

रत्नागिरी :- तालुक्यातील चिंचखरी येथून कॉलेज तरुणी बेपत्ता झाल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे . श्रेया मिलिंद भाटकर ( १८ , रा . चिंचखरी , रत्नागिरी ) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे . शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ती गोगटे कॉलेजला जाते , असे सांगून घरातून बाहेर पडली होती . सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिचा भाऊ अथर्व मिलिंद भाटकर ( २१ ) याने मैत्रिणींकडे तसेच आजूबाजूला शोध घेतला . श्रेयाचा कुठेच पत्ता न लागल्याने त्याने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली . या प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत .

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page