सार्वजनिक ठिकाणी कचरा न करण्याचे तहसीलदार साबळे यांचे आवाहन
देवरुख – “स्वच्छ भारत अभियान हे राष्ट्रीय अभियान असून ते देशपातळीवर राबवले जात आहे. स्वच्छ भारत ही एक सामुदायिक जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येक नागरीकांने प्रयत्न करून आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग समजून आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न करण्याचे भान ठेवल्यास हि मोहीम यशस्वी होईल” असे प्रतिपादन तहसीलदार अमृता साबळे यांनी मार्गदर्शन करताना केले.
स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य १ तास’ ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाच्या पुर्व संध्येला देवरूख तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
संंगमेश्वर (देवरूख) तहसील कार्यालय येथे या मोहिमेअंतर्गत तहसिलदार अमृता साबळे, नायब तहसिलदार यांच्यासह महसूल विभागाचे सर्व कर्मचारी यांनी सहभागी होत कार्यालय परिसर व कार्यालयाची स्वच्छता केली. तसेच तहसिल परिसरात वृक्षारोपण हि करण्यात आली.