दिवा/ प्रतिनिधी- कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहरातील गणेश नगर येथील राखी गोल्ड ज्वेलर्स ने दिवा शहरातील नागरिकांची फसवणूक करून फरार झालेले असून त्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आज मुंब्रा पोलीस स्टेशन येथे पोलीस इन्स्पेक्टर चव्हाण मॅडम यांची भेट घेतली.
त्यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ,कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका योगिताताई हेमंत नाईक ,मुंब्रादेवी विभाग प्रमुख हेमंत नाईक,डोंबिवली-नांदिवली चे उपविभाग प्रमुख वांद्रे साहेब,रविंद्र बरे व शिवसैनिक-महिला आघाडी व फसवणूक झालेले नागरिक उपस्थित होते.