आमदार शेखर निकम यांच्या एका हाकेनं चाकरमान्यांनी केली मेळाव्यास अलोट गर्दी
कोणाच्याही टिकेकडे लक्ष न देता मतदार संघाचा विकास करणे हेच माझे ध्येय-आमदार शेखर निकम
देवरूख- चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील सर्व जिल्हा परिषद गटनिहाय मुंबईकर चाकरमान्यांचे मेळावे मुंबईत घेण्याचे नियोजन आमदार शेखर निकम यांनी केले आहे. याची सुरूवात ओझरे जिल्हा परिषद या गटातील मुंबईतील ग्रामस्थांचा मेळावा दादर येथे महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट, श्रीकृष्ण मंदिर सभागृहात आमदार निकम यांच्या उपस्थितीत चाकारमान्यांच्या अलोट गर्दीने पार पडला. आमदार निकम यांनी मतदार संघात कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणत रस्ते, पाणी, पाखाड्या, संरक्षक भिंती अशी कामे विविध निधीतून मंजूर करत गावागावात विकास केला आहे. सरांमुळेच रखडलेले विविध प्रकल्प आणि पर्यटनदृष्टया विकासाच्या योजना मतदारसंघात आकार घेऊ लागल्या आहेत. यातूनच गावात झालेली इतर अनेक विकासकामे आणि मुंबईकर चाकरमान्यांच्या अपेक्षा यादृष्टीने आमदार निकम यांनी जिल्हा परिषद गटनिहाय मुंबईकरांचा मेळावा आयोजित केला होता.
मुंबईस्थित ओझरे गट मेळाव्यास चाकरमान्यांची अलोट गर्दी केली होती. लोकांच्या मनात असलेले आमदार शेखर निकम यांचे विषयीचे प्रेम या गर्दीतून जाणवत होते. लोकांना आपलं सुख-दु:ख जाणून घेणारा हक्काचा माणूस मिळाला आहे याचे एक वेगळेच समाधान लोकांच्या डोळ्यात दिसत होते. आमदार शेखर निकम यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपल्या सर्वाच्या आशिर्वादाने आमदार झालो अन कोरोना, महापुर यामुळे विकास कामे करताना खुप अडचणी आल्या त्यात होणारी सत्तांतरे यामुळेसुद्धा काम करताना खूप अडचणी येत होत्या. त्यातूनच विकास कामे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला, आपल्याशी भेटी गाठी सुद्दा झाल्या मात्र एकत्रीत असा भेटण्याचा अन आपल्याशी विकास कामांबाबत चर्चा करण्याचा योग येत नव्हता तो आज झालेल्या मेळाव्यात आला. मेळाव्यातील आपली उपस्थिती व आपले प्रेम अनुभले. कोणत्याही आमदारास जेवढे प्रेम मिळाले नाही तेवढे प्रेम मला आपल्या कडून मिळाले यांचे मला समाधान वाटले.
यावेळी सुरज चव्हाण (युवक अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश रा.काँ.पार्टी), नरेंद्र राणे (मुंबई कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश रा.काँ.पार्टी), बाप्पा सावंत (प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश रा.काँ.पा), श्री. अजित यशवंतराव, जयंतशेठ खताते (प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश रा.काँ.पा), राजेंद्र पोमेंडकर (संगमेश्वर तालुकाध्यक्ष), सुरेश घडशी (मंबई संपर्क प्रमुख ओझरे जि.प.गट), पुजाताई निकम (माजी सभापती पं.स. चिपळूण), रमेश राणे, राजेंद्र सुर्वे (जिल्हा बँक संचालक), अबुशेठ ठसाळे (चिपळूण तालुकाध्यक्ष), सुशिल भायजे (कार्याध्यक्ष युवक जिल्हा), पंकज पुसाळकर (युवक तालुकाध्यक्ष), संतोष जाधव (ओझर जि.प. गट अध्यक्ष), नितीन सालप (खडी ओझरे), संजय सावंत (निवेखुर्द), सुनिल जाधव (निगुडवाडी), अनंत कोटकर (हातिव), मोहन कदम (कासारकोळवण), जयराम ठेंबरे (मोर्डे), सनगले (वांझोळे), रविंद्र कोटकर (मुरादपूर), विश्वास सावंत, सिताराम बावधने, मुंबईस्थित प्रमुख रविंद्र हातिम (खडीओझरे), विश्वनाथ माईन (गावकर दखन), शिरीष दळवी (बामणोली गावकर), संजय परब (पाटील निवे), शांताराम गोरूले, पत्रकार (निगुडवाडी), प्रकाश लाखण (आंगवली), गोपीनाथ कदम (सोनारवाडी), बाबु कातळकर (तळवडे टिकळेश्वर), प्रकाश कनावजे (बेलारी), भरत जाधव (बेलारी), सुरेश भेरे (हरपुडे), शांताराम ठोंबरे (गावकर मोर्डे), दिपक शिवगण (गावकर वांझोळे), रोहीत गुरव (ओझरे), बळीराम बांडागळे (फौजदार मुरादपूर), संतोष कंरबेळे (अध्यक्ष संघर्ष समिती कासारकोळवण), संतोष चव्हाण (बोंडे ग्रामविकास मंडळ), मंगेश भालेकर (कनकाडी), विनय पंदेरे (सामाजिक कार्यकर्ते), सिताराम डांगे (मारळ), विश्वास सावंत (मारळ), राजाराम गुरव (निवधे), अशोक सावंत (कुंडी), प्रकाश लाखण, रविंद्र हातीम, सिताराम बावधणे, विश्वास सावंत, विनायक सनगले इ. कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. नितीन भोसले, मंगेश बांडागळे, हुसैन बोबडे, रामु पंदेरे, प्रदिप कांबळे, किसन राणे, प्रकाश सावंत, उदय सावंत, आण्णा परब, शरद जाधव, बाळा पंदेरे, जितू शेट्ये, किशोर सावंत, गजानन गुरव, रविंद्र गुरव, ओमकार गायकवाड, दत्ताराम चव्हाण, जितू नलावडे, तुकाराम गुरव, नितीन बांडागळे, रघुनाथ भालेकर, संतोष हुमणे, विकास राठोड इ. पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मेहनतीने मेळावा यशस्वीरीत्या पार पडला.