योगातून बालविकास – भाग १

Spread the love

 शरिराची जाणीव

आपले शरीर म्हणजे सर्व कार्यक्षम अवयवांचा समूह होय. थोडक्यात असे म्हणता येईंल ती एक चालती बोलती मशीन होय! आपल्या शरीरास स्वतंत्र अस्तित्व नाही. पंचमहाभूतांचा तो एक गोळा आहे. जोपर्यंत त्यात जीव आहे तोपर्यंत त्यास महत्त्व! एकदा का त्यातून जीव निघून गेला  की त्यास ठेवत नाही. मग तो कितीही महान अथवा सुंदर असला तरी त्यास जाळून टाकतात. शरीरात असलेल्या प्राणशक्तीमुळे ते सजीव दिसत असले तरी त्या शरीरास जाणीवेच्या कक्षेत आणण्याचे काम आपल्याला करावे लागते. त्यास आपण चेतना म्हणू. आपल्या अंतर्गत असलेल्या जीवन उर्मीच्या सहाय्याने ह्या चेतनेला योग्य दिशेने चेतवून आपल्याला हवे ते उद्दिष्ट नक्कीच गाठता येते. योगाने साध्य होणारी ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला आपल्या मुलांच्या ध्यानात आणून द्यायची आहे. शरीराबाबत ही जाणीव आपल्याला आपले आयुष्य अधिक चांगल्या रीतीने जगण्यासाठी मदत करते. याची कल्पना मुलांना आल्यास त्यांच्या जीवनाचे ते निश्चितच कल्याण करतील.

बाळ जेव्हा जन्माला येते तेव्हा तो पहिला श्वास घेते. त्यानंतर त्यास भूमीचा स्पर्श होतो. हळूहळू ह्या पंच महाभुंना ते अनुभवू लागते. या सर्वांतून ते खऱ्या अर्थाने सजीव होऊ लागते. ही पंच महाभूते त्याचा विकास करू लागतात. परंतू जसजसे ते मोठे होऊ लागते. तसतसे ते बाह्य घटकांकडे आकर्षिले जाते. आपण पालकही त्यास हातभार लावतो. बाळ जितके बहिर्मुख होईल तितके ते शारीरिक व मानसिक दृष्ट्या व्याधीग्रस्त होऊ लागते. म्हणूनच मनुष्याचा लहानपणापासून होणारा विकास कसा होतो आहे यावरच, पुढे जाऊन ते असामान्य होणार की इतरांसारखे पशुवत जीवन जगणार हे निश्चित होते.

प्रत्येकजण आपले शरीर लहानपणापासून पाहात आला आहे. त्यामुळे त्यास त्याबाबत फारसे महत्त्व किंवा आकर्षण वाटत नाही. बाह्य शरीर नेहमीच दृष्टीस पडत असले तरी शरीराच्या अंतर भागात काय आहे याची कल्पना मुलांना नसते. ती पालक व शिक्षकांनाही नसते. अशावेळी अंतर भागात असलेल्या अवयवांची विज्ञानातून माहिती देत असतांना ते जणू आपल्या अवयवांना अनुभवतील अशा पद्धतीने ती द्यायला हवी. अशा वेळी त्यांना समोर बोलाऊन आधी बाह्य अवयवांची ओळख करून द्यायला हवी. तो आहे म्हणून तुला काय फायदा होतो तो नसता तर काय झाले असते? असे साधे सोपे प्रश्न विचारून त्यांना विचार करण्यास भाग पाडले पाहिजे. आपल्या शरीरासोबतच आपले मन आहे याची त्यांना वेगवेगळी उदाहरणे देऊन खात्री करवली पाहिजे. आपल्या भावनांचा आपल्या अवयवांवर काय परिणाम होतो याचे प्रत्याक्षिक, तो भावनाशील झाल्यावर प्रत्यक्ष त्याच्या ध्यानात आणून द्यायला हवे. म्हणजे हळूहळू त्याला त्याच्या मानसिकतेची ताकद समजायला लागेल. त्याला त्याच्या कमजोरीही समजतील. म्हणून त्यास शिक्षण देतांना स्वतचे शरीर आरोग्यसंपन्न  कसे ठेवायचे व त्याच्या कृतीवर नियंत्रण कसे ठेवायचे, याचे ज्ञान त्यास दिले पाहिजे. त्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवण्यावर भर द्यायला हवा.

या सर्व शिक्षणासाठी काही कृती कार्यक्रम पहा ..

१) मुलांना गोल उभे करा

२) दोघांना मध्ये घ्या.

३) एकाला सांगा, तुज्या सोबत असणा-याचा हात पकड. त्याला वचारा हे काय आहे? उत्तर येईल “हा हात आहे”. 

४) अशाप्रकारे इतरांना क्रमाने बोलवा व शक्य असेल तितक्या अवयवांची ओळख त्यांच्या मुखातून करवून घ्या.

५) प्रत्येक अवयवांची स्वच्छता कशी करायची याची माहिती द्या. 

आता योग कृतीकार्यक्रम पहा 

कापलरंध्र धौती 

१) कपाळ चार बोटाने घासा.

२) भुवया चिमटीने दाबा 

३) डोळ्याखाली हाडावर दाब देत अर्ध गोलाकार मसाज करा.

४) कानाच्या सांध्यावर मागे पुढे अंगठ्याने दाब देत मसाज करा.

५) कानात बोटे (करंगळी) टाकून ३० वेळा गोल फिरवा. 

६) गळा वरच्या दिशेने घासा.

खालील संकल्पना त्यांच्या मनी रुजवा.

१) तुमचे शरीर हीच केवळ तुमची स्वत:ची मालमत्ता आहे.

२) तुम्ही शरीरास जे सांगाल तेच शरीर ऐकेल. त्यामुळे त्यास चांगले सांगा म्हणजे तुंम्ही चांगले बनाल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page