
अतिशय महत्त्वाची माहिती, दृकश्राव्य स्वरूपात, पहा-वाचा आणि पुढे पाठवा
मुंबई – मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविण्यासाठी आता मुंबईत मंत्रालयमध्ये येण्याची बिलकुल आवश्यकता नाही, अर्जाचा follow – up किंवा सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मंत्रालयात साधा फोन करण्याची देखील आवश्यकता नाही. आता आपल्या मोबाईलवरच प्रत्येक update मिळवा.
सूचना :- CMRF मधून अर्थसाह्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे याची राज्यातील सर्व गरजू रुग्णांनी नोंद घ्यावी. गैरप्रकार टाळण्यासाठी रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी play store वर CMMRF अँप्लिकेशन डाउनलोड करावे आणि स्वतः अर्ज करावा ही नम्र विनंती.)
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरु झालेली आहे.
या माध्यमातून
१.अर्जाची स्थिती,
२.निकषात असणाऱ्या आजारांची यादी आणि
३.नोंदणीकृत रुग्णालयांची यादी या विषयी माहिती प्राप्त होईल.
8650567567 या क्रमांकाच्या व्हॉट्सॲपवर केवळ Hi असे पाठवले असता आपणासमोर उपरोक्त तीन पर्याय उपलब्ध असतील.
यातील अर्जाची स्थिती या पर्यायावर क्लिक केल्यास लगेचच संबंधीत रुग्णाचा M अर्थात् मिटींग क्रमांक आणि त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक टाकणे गरजेचे आहे. याद्वारे आपणास आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मदत होईल.
आपण आजारांची यादी या क्रमांक दोनच्या पर्यायावर क्लिक केल्यास आपणास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये समाविष्ट असणाऱ्या एकूण 20 आजारांची यादी प्राप्त होईल.

आपण नोंदणीकृत रुग्णालये या क्रमांक तीनच्या पर्यायावर क्लिक केल्यास आपणास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत रुग्णालयांची यादी पीडीएफ स्वरुपात आपणास प्राप्त होईल.