मराठा आरक्षणाबाबत(Chief Minister) सरकारने काढलेल्या अधिसूचनेनंतर आज मनगळवारी (२० फेब्रुवारी) विधानसभेचं विशेष अधिवेशन पार पडणार आहे. आजच्या अधिवेशेनात मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
आज मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. यात टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीतलं मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आणि कुठल्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळेल. सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं हे सरकार आहे, असं मुख्यमंत्री(Chief Minister) एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
मराठा आरक्षण संदर्भात विशेष अधिवेशन सुरू होत आहे. मागील 2 वेळा आरक्षण देण्यात आलं पण ते टिकू शकलं नाही. त्यावेळी ज्या त्रुटी सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनास आणून दिल्या त्यांची दुरुस्ती करून आजचे विधेयक सादर होईल, असे मला वाटतं. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक ठराव होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं.
‘सगेसोयरें’बाबत २० फेब्रुवारीला अंमलबजावणी केली नाही, तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू. जर सगेसोयरेंबाबत भूमिका स्पष्ट झाली नाहीतर लगेच आंदोलनाची घोषणा करणार आहोत. त्यानंतर २१ तारखेला नियोजनबद्ध आंदोलनची दिशा ठरवली जाणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.