लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीक्स मधून पीएचडी करत असलेल्या एखा गुरूग्राम येथील विद्यार्थीनीचा अपघातात मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थीनीचं नाव चेष्ठा कोचर असं असून ट्रॅकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कोचर यांनी आधी NITI आयोग म्हणजेट नॅशनल इंस्टीट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडियामध्ये देखील काम केलं आहे. या अपघात प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेलं नाहीये. ३३ वर्षीय चेष्ठा या १९ मार्च रोजी सायकलिंग करत होत्या. तेव्हा त्यांचे पती प्रशांत हे देखील त्यांच्या सोबत होते आणि ते थोडे पुढे निघून गेले होते.
अचानक त्यांना मोठा आवाज ऐकू आला तेव्हा त्यांना अपघाताबद्दल समजलं. हे दोघे सायकल चालवून घरी परत येत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि पॅरामेडिक्स घटनास्थळी पोहचले होते.मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीसांनी सांगितलं की तो ट्रक कचार गोळा करणारे वाहन होते. तसेच तपासात ड्रायव्हरची मदत घेतली जाक आहे.
उत्तर प्रदेशच्या बरेली येथे जन्मलेल्या चेष्ठा लंडन जाण्याआधी गुरुग्राम येथे राहत होत्या. मागील सप्टेंबर महिन्यात त्या पीएचडीसाठी लंडन येथे शिफ्ट झाल्या. यापूर्वी त्या NITI आयोगामध्ये काम कर होत्या, येथे त्यांनी बिहेवियरल सायंसेस साठी यूनिट देखील स्थापन केलं होतं. त्यांनी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनसोबत देखील काम केलं आहे.
त्यांनी दिल्ली विद्यापीठात अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर यूनिव्हर्सिटी ऑफ शिकागो सह अनेक मोठ्या संस्थांमध्ये शिक्षण घेतलं. त्यांचे पती सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. दोघांच्या लग्नाला अवघे एक वर्षच झाले होते.