राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. उल्का विश्वासराव यांनी आस्था ट्रेनला दाखवला भगवा झेंडा.
पनवेल – “उत्साह, भक्तिभाव आणि ऐतिहासिक लढ्यानंतर प्राप्त झालेल्या दैदिप्यमान विजयाचे मूर्त रूप श्रीराम जन्मभूमी अयोध्या मंदिर डोळे भरून पहाण्याची आस असलेल्या श्रीरामललाच्या भक्तगणांना घेऊन जाणाऱ्या आस्था ट्रेनला काल रात्री भाजपा नेत्या, राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. उल्का विश्वासराव यांनी भगवा झेंडा दाखवत यात्रेचा शुभारंभ केला.
▪️भारतीय समाजमनाचा मानबिंदू असलेल्या मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.-देशविदेशातील रामभक्तांनी हा दिव्य सोहळा याची देही याची डोळा पाहिला.
▪️भक्तगणांच्या या आस्थेचा सन्मान करत भारतीय जनता पार्टीने आपले नैतिक दायित्व आणि आध्यात्मिक जाणिवेतून ‘आस्था ट्रेन’च्या माध्यमातून लोकांना रामदर्शनाचा लाभ देण्याचा संकल्प केला. आस्था ट्रेन पनवेल ते अयोध्या प्रवास करणार असून एकूण १२५० रामभक्त अयोध्येला निघाले आहेत. यामध्ये राजापूर विधानसभेतील २३४ रामभक्तांचा समावेश आहे.
▪️सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आता रामरायाच्या चरणी कधी एकदा माथा टेकवतोय अशा भावना प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळत होत्या. “जय श्रीराम!! सियावर रामचंद्र की जय, भारतमाता की जय, हर हर महादेव” अशा घोषणांनी पनवेल रेल्वे स्टेशनचा संपूर्ण आसमंत अगदी दुमदुमून गेला होता.
▪️यात्रेकरूंची यात्रा सफल आणि मंगलमय व्हावी याकरता रेल्वे प्रशासनाने संपूर्ण शक्ती पणाला लावली असून यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा तैनात ठेवला होता.
▪️ट्रेनचा शुभारंभ करताना सौ. विश्वासराव यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष, लोकसभा प्रभारी श्री. अतुल काळसेकर, कोकण समन्वयक श्री. बाळासाहेब पाटील, भाजपा नेते, मा. आमदार रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार, राजापूर विधानसभा संयोजक श्री. चंदूभाई लिंगायत आदी मान्यवर उपस्थित होते. या ट्रेनचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी श्री. प्रमोद जठार पार पाडणार असून त्यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा देतानाच आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.