संगमेश्वर (प्रतिनिधी :- दिनेश आंब्रे )
दि १४ जुलै 2023 रोजी ने चांद्रयान- ३ सुरुवात झाली ही मोटिम 23 ऑगस्ट रोजी ६ वाजून ४ मिनीटांनी चंद्रावर दक्षिण ध्रुवावर यशस्वी पणे हे यान उतरल ही मोहिम यशस्वी करण्यासाठी भारतीय संशोधक अविरतपणे संशोधन केले.जगातील ४थ्या स्थानावर आपल्या भारत देशाचे नाव उज्वल झाले.
मग हीच दखल शाळा फणसवणे येथील विध्यार्थीनी घेतली व संशोधकाचे अभिनंदन करण्यात मानवंदना दिली. जि.प. आदर्श विद्यार्थी नी चांद्रयान -3 साठी इस्रो या कलाकृतीने मानवंदना दिली.मोहिमेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून यांनी सर्व काम पाहिले.
इस्रोने चांद्रयान मोहीम यशस्वी करुन इतिहास रचला आहे.
यांची सविस्तर माहिती शिक्षक श्री विकास फटकरे सरांनी दिली.शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र कदम सर शिक्षक विकास फटकरे सर श्री धनाजी भांगे सर व शिक्षिका माधुरी कुचेकर मॅडम आदी यांनी चांद्रयान 3 या कलाकृतीसाठी साठी सर्व विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य केले.या विशेष कलाकृतीत पृथ्वी गोल विशेष आकर्षण होते.