*मुंबई-* बंगालच्या उपसागरात एकामागून एक तयार होत असलेल्या कमी दाबांच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला आहे. राज्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज रायगड, पुणे आणि साताऱ्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे अवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रायगड, पुणे सातारा येथे जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूरमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांच्या खेळात श्रावण सरींची शक्यता वर्तवण्यात आली. पावसामुळे राज्याच्या तापमान घट झाली असून वाऱ्याचा वेग वाढल्याने हवेत गारठा वाढला आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांत दक्षिण राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीकर्नाटकमध्ये अतिमुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दिल्ली, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात या आठवड्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण मान्सून दोन तीव्र हवामान प्रणालींच्या विकासासह सक्रिय आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने ही माहिती दिली. पूर्व भारतातील गंगेच्या पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि झारखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.