केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून विविध योजना तळागाळात पोहोचविण्याचा प्रयत्न…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नव उद्योजक, उदोजक यांना विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विभाग या केंद्र शासनाच्या उद्योग विभागाचा मेळावा रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून रत्नागिरीतल उद्योजकांसाठी हा मेळावा घेण्यात येणार आल्याचे निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यापूर्वी सिंधुदुर्ग मध्ये अशा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राणे साहेबांनी केंद्राचे तब्बल 70 ते 80 अधिकारी सिंधुदुर्ग मध्ये दाखल झाले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. उद्योगाच्या नवनवीन संधी या निमित्ताने उपलब्ध होतात. सिंधुदुर्ग मध्ये यां उद्योग मेळाव्यामुळे क्वाअर बोर्डाचे कार्यालय सुरु झाले. अनेकांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध झाले. त्याचा सिंधुदुर्ग मध्ये गावागावात परिणाम दिसून आला. तसाच परिणाम रत्नागिरीमध्ये सुद्धा करण्याचा आमचा प्रयत्न असून नव उद्योजक, उद्योजक निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे निलेश राणे यांनी सांगितले.
याचं माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेली विश्वकर्मा योजना इथे तळागाळात पोहोचविण्याचा आमचा प्रयन्त असेल, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि संपूर्ण भाजपा पक्ष यासाठी कामाला लागले असून लवकरच फेब्रुवारीतील तारखा जाहीर होतील असेही राणे यांनी सांगितले.