कर्जत: (सुमित शिरसागर)- राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी खुलासा करा म्हणत माझ्याकडे सरकवल्या. काही गोष्टी गुलदस्त्यात राहायला हव्यात मात्र काही कार्यकर्त्यांना समजायला हव्यात म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी
२००४ मध्ये भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यामुळे युती होता होता राहिली असा गौप्यस्फोट केला. त्यावेळीं तीन पक्षात १६-१६-१६ असा फॉर्मुला करत लोकसभा लढण्याचा निर्णय घेत भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या घरी हि बैठक झाली. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंग यांच्या सूचनेनुसार हे झालं होतं. अशी माहिती पटेल यांनी आपल्या भाषणात दिली.
कर्जत रेडिसन ब्लु हॉटेल खांडपे येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वैचारिक मंथन शिबीर सुरु आहे. या शिबिरात पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बोलतानाच मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. मंथन शिबिरात बोलताना पटेल म्हणले कि २००४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपसोबत युती करणार होतो. यामुळे गोपीनाथ मुंडे हे खुश होते. पण त्यांना यात विशेष सोबत घेतलं गेलं नाही. पण प्रमोद महाजन याना हे नको होत.
▪️हेही पहा-
प्रमोद महाजन यांना मिटिंगच माहिती नव्हतं. त्यांना वाटलं की मी दिल्लीतील महाराष्ट्राचा निर्विवाद नेता आहे. शरद पवार सोबत आले तर आमचे दिल्लीतील वरिष्ठ नेते शरद पवारांचं ऐकतील माझं ऐकणार नाहीत. त्यामुळे त्यांनी ही गोष्ट बाळासाहेबांना सांगितली . त्यावेळी बाळासाहेबांनी आडवेतिडवे वक्तव्य केले आणि आमची २००४ ला होणारी युती फिस्कटली. अशा अनेक गोष्टी असून माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. भविष्यात मी यावर देखील पुस्तक लिहिणार आहे. त्यावेळी हे किस्से तुम्ही पुस्तकातच वाचा.
मी शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आहे. शरद पवार काँग्रेसमधून १९७८ साली बाहेर पडले आणि १९८६ मध्ये परत आले. शरद पवार हे कायम प्रवाहासोबत चालले आपण देखील प्रवाहासोबत चाललो आहोत त्यात गैर काय ? असा प्रश्न करत वसंतराव हे शरद पवार यांचे गुरु असून ते राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री असताना नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री बनले तेव्हा शरद पवार यांच्या विवेकानि त्यांनी या महाराष्ट्राचं भलं कसं व्हावं या हेतूने पु.लो.चं सरकार स्थापन केलं. त्यावेळी त्या सरकारमध्ये हासू अडवाणी, उत्तमराव पाटील हे भारतीय जनसंघाचे संस्थापक होते पण गेले ना तेव्हा त्यांच्यासोबत त्यावेळी तत्व नाही पण महाराष्ट्राचा विचार त्यांनी देखील केला. असे पटेल म्हणाले तर अजित पवार यांना हे भेकड म्हणतात. मी त्यांना सांगतो राज्यांत जो कोणी मर्द असेल तर ते एकमेव अजित पवार आहेत. अजित पवार यांचे चांगले आणि गोड संबंध होते. पण, मी शरद पवार यांच्या जवळ होतो. त्यामुळं अजित पवार यांच्यासोबत मी गेलो त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटलं की, अजित पवार यांच्यासोबत कसं काय गेलो? अनेकांना वाटलं यांचं आतून सख्य आहे.
आपण अजित पवार यांच्यासोबत जाताना राजकीय भूमिका घेतली होती. आता आपण भूमीका घेतली आहे दादा एके दादा, असं ते म्हणाले तर राज्याच्या देशाच्या भविष्यासाठी आपण अजित पवार यांच्या सोबत जे पाऊल टाकलं ते मोठं आव्हान आहे ते आपल्याला यशस्वी करून दाखवायचं आहे. हि जबाबदारी आपल्या सर्वांवर असून त्याकरताच हे शिबीर आहे.