(Maharashtra Budget 2024) सादर करणार आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडं अर्थ खात्याचा भार असल्यानं ते अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत.
मुंबई Maharashtra Budget Session 2024- अर्थमंत्री अजित पवार हे उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पायाभूत सुविधा, शहरी भागांसाठी विविध प्रकल्प, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद, शेतकऱ्यांसाठी पॅकेज आदीबाबतच्या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यात राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्याअनुषंगानं आमदारांच्या मतदारसंघातील रस्ते, पूल, सिंचन प्रकल्प यांसह अन्य कामांसाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली जाण्याचे संकेत आहेत.
अजित पवार सादर करणार अंतरिम अर्थसंकल्प-
राष्ट्रवादीत बंड करुन अजित पवार हे काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर अजित पवार यांच्याकडं अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळं यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प हा अर्थमंत्री अजित पवार हे सादर करणार आहेत.
विरोधक आक्रमक-
राज्य सरकारचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना चाहापानासाठी सत्ताधारी पक्षानं रविवारी आमंत्रित केलं होतं. मात्र, विरोधी पक्षांनी या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत सरकारवर विविध मुद्द्यांवरुन जोरदार टीका केली होती. फसव्या सरकारच्या चहापाण्याला जाण्यास विरोधकांना कुठलाही रस नसल्याचं सांगत, विरोधकांनी सरकारच्या चहापाण्यावर बहिष्कार घातल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.