*श्रीकृष्ण खातू / संगमेश्वर –* गेले आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर आज दिवसभर अतिशय उष्णतेने घायाळ व्हायला झाले होते. परंतु संध्याकाळी पाच वाजता अचानक विजांच्या गडगटासह मुसळधार पाऊस कोसळू लागला.
त्यामुळें बाहेर पडलेल्या लोकांची व व्यापारी म़डळींचे धावपळ सुरू झाली.रस्ता व खड्डे जलमय झाले.तयार झालेल्या हळवी भातशेतीची कापणी केल्याने शेतकर्यांचे या पावसामुळे नुकसान होत आहे.
सदरचा पाऊस सावर्डा आरवली तुला धामणी संगमेश्वर पट्ट्यामध्ये पडत आहे भात शेतीचे कामे मोठ्या प्रमाणात चालू असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांचे धावपळ होत आहे. शासनाने पावसाचा अंदाज वर्तवणे फार गरजेचे असताना ते अंदाज वर्तवलेल्या दिसून येत नाही. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई चे पंचनामे करावे असे नागरिकांची व शेतकऱ्यांची मागणी आहे त्याचा विचार महसूल खात्याने करावा.