
१. सध्या वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नाईक कंपनी/ मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी १ फूट पाणी भरलेले आहे.
२. नगरपालिकेच्या बोटी सांस्कृतिक केंद्र, शंकरवाडी, बाजारपेठ विसर्जन घाट, ST stand, नगरपालिका कार्यालय या ५ ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत.
३. नगरपालिका पथके ९ ठिकाणी तैनात आहेत.
४. तलाठी, पोलीस व NDRF पथके ६ ठिकाणी तैनात केलेली आहेत. एका पथकात ५ तलाठी, ३ पोलीस व ३ जवान आहेत. या पथकासोबत एकूण ४ बोटी आहेत.
६ ठिकाणे- नाईक कंपनी, ओसवाल शॅापी, वडनाका, मुरादपूर, सांस्कृतिक केंद्र, पेठमाप
५. सध्या एका कुटुंबातील ( शिंदे) ३ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे.
६. परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. कोणतीही समस्या नाही.
७. कुंभार्ली घाटात दरड कोसळलेली होती. तेथील दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. आता दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू आहे.
८. कोकण रेल्वे- कोणतीही समस्या नाही. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
