
वर्धा | महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. वर्धा नदीत बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात ११ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे. बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरुड तालुक्यातील झुंज गावाजवळ ही घटना घडली. वर्धा ग्रामीण एसपी हरी बालाजी यांनी सांगितले की, बोट बुडाल्यानंतर आतापर्यंत ३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, उर्वरितांचा शोध सुरू आहे.
बालाजी म्हणाले की, ही घटना बेनोडा शहीद पोलीस स्टेशन हद्दीतील श्री क्षेत्र झुंज, अमरावती येथे मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. बालाजीने सांगितले की, बोटीवरील ११ जण एकाच कुटुंबातील होते.
प्राथमिक माहितीनुसार, वर्धा नदीच्या एका बाजूने दुसरीकडे जात असताना बोटीचा अपघात झाला. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्याने हा अपघात झाला असावा, अशी आशंका व्यक्त केली जात आहे. या बोटीत ३० हून अधिक लोक होते. नदीच्या मध्यभागी बोट बुडाली. यादरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि काही लोकांना सुखरूप बाहेर काढले. आतापर्यंत तीन मृतदेह सापडले असून आठ जणांचा शोध सुरू आहे.