कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खासदारच आवश्यक.

Spread the love

– लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठारांचे प्रतिपादन.

जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख । डिसेंबर ०७, २०२३.

लोकसभा प्रवास योजनेंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील २ दिवसीय प्रवासादरम्यान आज रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार यांनी देवरूख येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत विकास, कार्यक्षमता, ध्येय, आणि कणखर निर्णय घेण्याची क्षमता याविषयक भाष्य करून राजकीय चौकार-षटकार मारले. यावेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव, रत्नागिरी (द.) जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव, संगमेश्वर (द.) तालुकाध्यक्ष श्री. रुपेश कदम यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमोद जठार म्हणाले, “आज नागरिकांपुढे अनेक समस्या आहेत. मागील ६० वर्षे या समस्यांमध्ये सातत्याने वाढ झाली. मात्र आज जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्या समस्यांवर उत्तर देण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता संसदेत खासदार म्हणून जाण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील १० वर्षे केंद्रात आमचे सरकार जरूर आहे, मात्र आमच्या सहकार्याने या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेल्या खासदार महोदयांनी याचा लाभ कोकणाच्या विकासासाठी वापरला नाही ही खेदाची गोष्ट आहे.”

“सर्वांगसुंदर निसर्ग लाभलेल्या कोकणात केंद्र सरकारच्या पर्यटन विकास यापूर्वीच झाला असता मात्र अजूनही परिस्थिती बिकट आहे याचे एकमेव कारण म्हणजे आपले विद्यमान खासदार. कोणत्याही विकासकामाला विरोध करणे आणि कोकणात रोजगारनिर्मिती होऊ न देणे हा कार्यक्रम त्यांनी सातत्याने राबवला असल्याने आज कोकणातील तरुण मुंबईत स्थलांतरित होत आहे. त्यामुळे कोकणातील खेडी ओस पडत आहेत.” असे स्पष्ट करत कोकणच्या दुरावस्थेला खासदार विनायक राऊत यांना जबाबदार धरले.

“रिफायनरी हा विषय समोर आणणारा, त्यासंदर्भात आग्रही भूमिका मांडणारा प्रमोद जठार आहे ही गोष्ट खरीच आहे. यातून रोजगारनिर्मिती होईल हा माझा विश्वास आहे. याशिवाय जवळपास ६ हजार बायप्रॉडक्ट्स तयार करण्याची क्षमता रिफायनरीमध्ये आहे. अनेक नवे उद्योग कोकणात आणून कोकणाला खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी केंद्रात मा. मोदींजींचे नेतृत्व असणे गरजेचे आहेच; सोबतच केंद्र सरकारची धोरणे, योजना कोकणातील जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी भाजपाचा खासदार संसदेत जाणे काळाची गरज आहे. आणि यावेळी कोकणचा जनादेश भाजपाला मिळणार याबाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही.” असा आशावाद श्री. जठार यांनी व्यक्त केला.

▪️आपल्या खासदारकीबाबत ते म्हणाले, “मी पार्टीचा कार्यकर्ता आहे. वरिष्ठांनी मला लोकसभा निवडणूक म्हणून दिलेले दायित्व पूर्ण क्षमतेने पार पाडण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. अशात सध्या मी फारसा त्याबाबत विचार करण्यात वेळ घालवत नाही. मात्र एक नक्की पार्टीने संधी दिली तर मी नक्की लढेन आणि माझा सर्व कार्यकर्त्यांवर असलेला विश्वास मला सांगतोय की यावेळी मी लढलो तर नक्की जिंकेन. चिपळूण-संगमेश्वर विधानसभेत प्रमोद अधटराव आमचे नेते आहेत. आत्ता आमचे लक्ष्य लोकसभेवर असल्याने अन्य कोणत्याही विषय आमच्यासाठी महत्त्वाचे नाहीत. फक्त एकच गोष्ट, कोकणचा विकास होण्यासाठी जनतेने भाजपाला एक संधी द्यावी आणि त्यासाठी पत्रकार बांधवांनी योग्य गोष्टी, सत्यासत्यता पडताळून लोकांपर्यंत पोचवाव्यात ही विनंती.”

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page