डिजीटल दबाव वृत्त
मुंबई: मनते नेत संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर, नितिन सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीचं नेमकं कारण काय, भाजप आणि मनसे युतीचा प्रस्ताव हे या भेटी मागचं गुपित आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अशात भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे
आता मनसे नेते संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर आणि नितिन सरदेसाई यांनी फडणवीसांची गुप्त भेट घेतल्याने भाजप- मनसेमध्ये युती होणार का? याबाबत चर्चा होत आहे. विशेष म्हणजे मनसे नेते संदिप देशपांडे यांनी देखील फडणवीसांसोबत बैठक झाली असल्याचे म्हटले आहे.
फडणवीसांसोबतची ती सदिच्छा भेट : संदीप देशपांडे
दरम्यान याच भेटीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमची विशेष अशी काही चर्चा झाली नाही. बऱ्याच दिवसांपासून फडणवीसांना भेटायचं होतं. त्या दृष्टीने आम्ही तिघांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळे ती एक फक्त सदिच्छा भेट होती. तसेच पुढेही प्रसंग आल्यास अशा सदिच्छा भेट नक्कीच होतील. आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो, तर प्रत्येक वेळी त्याचा काहीतरी अर्थ काढला पाहिजे असे नाही. एकमेकांना भेटणं महाराष्ट्राचा इतिहास आहे. देवेंद्र फडणवीस हे देखील राज ठाकरे यांना येऊन भेटतात. त्यामुळे आम्ही देखील त्यांना भेटलो, असल्याचे देशपांडे म्हणाले आहेत.
जाहिरात