
रत्नागिरी : भाजप हा कार्यकर्त्यांना प्राधान्य देणारा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या भावना काय आहेत याला महत्त्व आहे. तुम्ही बुथ मजबूत करायला सांगता, पण रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद काय आहे, हे दाखवायची संधीच देत नाही. त्यामुळे एकदा तरी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढायला द्या, अशी कार्यकर्त्यांची मागणी असून आपण ती प्रदेशाध्यक्षांच्या कानी घालणार असल्याचे भाजपचे नेते व मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
रत्नागिरी दौऱ्यावर मिरकरवाडा येथे बंदर विकास प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी आलेल्या नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, महायुती म्हणून येथे चांगले काम आहे. भाजपचे पक्ष म्हणून कार्यकर्ते चांगले काम करीत असून, बुथ कमिट्या मजबूत करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्हाला संधी द्या, अशी त्यांची मागणी आहे. जर आम्ही काय काम करीत आहोत हे दाखवायची संधीच मिळाली नाही तर भाजपाची जिल्ह्यात ताकद किती आहे, हे कसे कळणार असा प्रश्न भाजपाच्या स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या कानावर कार्यकर्त्यांच्या भावना घालाव्यात व स्वबळावर लढण्याची संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. असे ना. नितेश राणे यांनी सांगितले . रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असून त्यांनी वीस कोटीचा निधी विकासासाठी मिळतो तर भाजपाचे खासदार नारायण राणे यांना पाच कोटीचा निधी मिळतो. त्यातही भाजपाचे पदाधिकारी जिल्ह्यात चांगले काम करीत आहेत. त्यामुळे त्यांची मागणी आपण वरिष्ठ नेत्यांच्या कानी घालणार असल्याचेही राणे यांनी सांगितले.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर