देवरुख- भाजपच्या देवरुख शहर पदाधिकाऱ्यांनी आज गुरुवारी नगरपंचायतीवर धडक देत शहरातील विविध समस्यावर तातडीने उपाययोजना करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
देवरुख शहरातील रस्त्याची दुरुस्ती, स्मशानभूमीला पुरेसा लाकूड पुरवठा, घंटागाडी नियमित वेळेत येण्याबाबत, मैलागाडी कायम उपलब्ध असणे, शहरातील उद्यानांची देखभाल, पथदीप दुरुस्ती आणि उनाड गुरांचा बंदोबस्त अशा विविध समस्यांबाबत देवरूख शहर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी चेतन विसपुते यांची भेट घेतलली व वरील सर्व बाबींवर सखोल चर्चा करत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष व भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये, भाजपचे देवरूख शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष सुशांत मुळे, संतोष केदारी, कुंदन कुलकर्णी, राजेंद्र गवंडी, संजय राजवाडे, चेतन पाडळकर, संजय इंदुलकर, शंकर मालप, संदीप वेलणकर, सुबोध लोध, पुष्कर शेट्ये सितेश पर्शराम, प्रभंजन केळकर आदि. भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.