रात्री वाढदिवस साजरा अन् सकाळी अंत्यसंस्कार…

Spread the love

नाशिक – रविवारी रात्री वाढदिवस साजरा झालेल्या एका मुलाचा सोमवारी पहाटे सर्पदंशाने मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील वटार गावात घडली आहे.

स्वराज सागर खैरणार असे मृत मुलाचे नाव आहे. त्याचा रविवारी वाढदिवस होता. तो रात्री आनंदाच्या वातावरणात पार पडला. त्यानंतर रात्री झोपेत त्याला विषारी सापाने चावा घेतला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण उचारापूर्वीच सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास त्याचा दुःखद मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, सर्पमित्र देवा पवार यांनी खैरणार यांच्या घरात पलंगाखाली लपलेल्या पहाडी कोब्रा जातीच्या सापाला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page