
मुंबई ,26 सप्टेंबर- बिग बॉसचा १६ वा सीझन संपल्यानंतर आगामी सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. यानंतर आता व्या सीझनची घोषणा निर्मात्यांनी केल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन १७’चे तीन प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहेत. तर दुसरीकडे या सीझनमधील काही स्पर्धकाच्या नावाची लिस्टदेखील जारी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून आगामी बिग बॉस सीझनची चाहते प्रतिक्षा करत होते. दरम्यान नव्या प्रोमोसोबत निर्मात्यांनी १७ व्या सीझनची घोषणा केली आहे.
बिग बॉस १७च्या नव्या तिन्ही प्रोमोमध्ये सुत्रसंचालक सलमान खान वेगवेगळ्या तीन रुपात पाहायला मिळतोय. पहिल्यांदा बॉम्बशोधकाच्या रुपात, दुसऱ्यांदा गुप्तहेराच्या रुपात आणि तिसऱ्यांदा कव्वाली गायकाच्या रुपात दिसत आहे. दरम्यान सीझन १७ दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजीपासून चाहत्यांच्या भेटीस येत असल्याची घोषणा केली आहे. पुन्हा एकदा सलमानला पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्याची उत्कंठा वाढली आहे.