सेनेगलमध्ये मोठा विमान अपघात; बोईंग विमान धावपट्टीवरून घसरले; विमानाला लागली आग; १० प्रवाशी जखमी…

Spread the love

डकार- सेनेगलची राजधानी डकार येथील विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली. बोईंग 737 विमान धावपट्टीवरून घसरले. त्यामुळे विमानाला आग लागली आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या घटनेत विमानातील 10 प्रवासी जखमी झाले आहेत. देशाचे परिवहन मंत्री एल मलिक एनडिया यांनी गुरुवारी सांगितले की विमानात एकूण 85 लोक होते. ट्रान्सएअरद्वारे संचालित एअर सेनेगलचे बोईंग 737 विमान बुधवारी रात्री उशिरा बामाकोकडे जात होते. त्याच वेळी विमानाला अपघात झाला. विमानात 79 प्रवासी, दोन पायलट आणि चार क्रू मेंबर्स होते. कोणतीही जिवीतहानी नाही.

विमान अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर लोकांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सेनेगलमधील बोईंग विमानाने धावपट्टी सोडल्यानंतर काही वेळा विमानतळ पुन्हा सुरू करण्यात आले, अशी माहितीही परिवहन मंत्र्यांनी दिली. एका प्रवाशाने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार विमानाला आग लागल्याचे दिसले. मालियन संगीतकार झेक सिरिमने सिसोकोने फेसबुकवर एका पोस्टमध्ये लिहिले की आमच्या विमानाला नुकतीच आग लागली. विमानाच्या एका बाजूला ज्वाळांनी पेट घेतल्याने रात्रीच्या वेळी प्रवासी आपत्कालीन स्लाइडवरून खाली उडी मारताना दिसले. व्हिडिओमध्ये लोकांचा आरडाओरडाही स्पष्टपणे ऐकू येत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page