भुसावळ पोलिसांनी खतरनाक दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या; २ पिस्तूल, ५ तलवारी, ४ चाकू, १ फायटर, मिरचीपूड जप्त…

Spread the love

जळगाव-जळगावच्या भुसावळमध्ये पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई केली आहे. सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या सात सदस्यांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चार जिवंत काडतुसे, दोन पिस्तूल, तलवारी आणि चाकू जप्त केले आहेत. आरोपी मध्य प्रदेश, खंडवा आणि फैजपूर येथील असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

जळगावच्या भुसावळमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सशस्त्र धाडसी दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चार जिवंत काडतूस, दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, पाच तलवारी, चार चाकू, एक फायटरसह मिरचीची पूड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात संशयित आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे मध्य प्रदेश, खंडवा भुसावळ, फैजपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेत या घटनेबाबत माहिती दिली आहे.

जळगावच्या भुसावळ-नागपूर महामार्गालगत वाटर पार्क परिसरात सशस्त्र धाडसी दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या घटनेत पोलिसांनी मॅकझिनसह दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, चार जिवंत काडतूस, पाच तलवारी तसेच चार चाकू, एक फायटर आणि मिरचीची पूड असा मुद्देमाल जप्त केला आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यात सात दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे मध्य प्रदेश, खंडवा भुसावळ, फैजपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या पोलिसांच्या कामगिरीची पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page