वांद्रित नेमके काय घडले ?… “त्या” मुलीने प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला, गावकऱ्यांनीही कायदा हातात न घेता संयम दाखवत पोलिसांकडे रितसर तक्रार केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनीही तातडीने कारवाई केली.
संगमेश्वर – संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील एका शाळेतील शिक्षकाने मुलींशी अश्लील चाळे केल्यानंतर आरोपी संजय मुळ्ये याचे एकेक कारनामे समोर येत आहेत.
अखेर तो शिक्षक निलंबित …
शिक्षक पेशाला काळिमा फासणाऱ्या त्या संजय मुळ्ये शिक्षकांला सेवेतून कालच निलंबीत केल्याची माहिती शिक्षणाधिकारी भिकाजी कासारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी मुलीशी अश्लील चाळे केल्या प्रकरणी संजय मुळ्ये याला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सेवेत निलंबित केल्याची माहिती शिक्षणाधिकारी भिकाजी कासार यांनी दिली.
कालच संजय मुळ्ये याला पोलिसांनी अटक केल्यावर फोस्कोच्या अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ जिल्हा परिषदेने त्यांना सेवेतून निलंबित केले आहे संजय मुळ्ये हा पाचवी सहावीतल्या मुलींशी नको ते कृत्य करायचा.27 ऑगस्टला एका लहान मुली सोबत घटना झाली की ते मुलीला सहन झाले नसल्याने तिने ते पालकांना सांगितले.
शिकवणुकीच्या नावाखाली मुलीसोबत अश्लील चाळे …
शिकवणुकीच्या नावाखाली संजय हा पाचवी, सहावीतील मुलींना हेरून तो त्यांच्याशी घाणेरडे असे कृत्य करत असल्याच्या चर्चा रंगु लागल्या आहेत. हा शिक्षण कमी आणि नको तेच शिक्षण घेत होता. 27 ऑगस्ट रोजी तो एका मुलीसोबत अश्लील चाळे करण्यात रंगलेला असताना . त्या मुलीला ते सहन झालं नाही. त्यामुळे चिडलेल्या त्या मुलीने जोरात प्रतिकार करत त्याच्या दोन्ही हाताला करकचून चावा घेतला. आणि त्याच्यापासून सुटका करून घेतली. धावतच ती तेथून बाहेर पडली. त्यानंतर मात्र घाबरलेल्या या मुलीने झाला सारा प्रकार आणि त्या शिक्षकाचा प्रताप आपल्या घरी सांगितला. त्यानंतर गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या नराधम शिक्षकाचा खरा चेहरा समोर आला.
गावकरी झाले आक्रमक
गावाच्या इतिहासात नव्हे तर कदाचित तालुक्यात अशाप्रकारची घटना प्रथमच व नको ती घडल्याने गावकऱ्यांच्या संतापाचा पारा भर पावसात हाय झाला. ते आक्रमक झाले. बातमी वाऱ्यासारखी पसरली. मुलीच्या पालकांनी ही घटना गावातील काही लोकांच्या कानावर घातली. मग सभा घेऊन त्यावर चर्चा केली. पालक सभा, ग्रामस्थ यांनी शिक्षकाला चांगलाच धडा शिकवायच्या निर्धाराने उतरले. संतप्त ग्रामस्थ दुसऱ्या दिवसाची वाट पाहत होते.
अखेर त्याची गचांडी धरली
शाळा सुटल्यानंतर एकेक ग्रामस्थ शाळेच्या दिशेने जमू लागले एकामागोमाग एक करत शेकडो ग्रामस्थ शाळेवर धडकले. सायंकाळची वेळ असल्यामुळे आणि महामार्गावरच शाळा असल्याने आणखी जमाव गोळा झाला. शाळेचा परिसर जमावाने भरून गेला होता. शिक्षकाची बोबडीच वळली. त्याला काही कळेनाच, ग्रामस्थ शाळेत गेले. त्याची गचांडी धरून घडलेल्या घटनेचा जाब विचारला. जमावासमोर त… त… प… प… करू लागला. याचे शरीर मात्र जमावाचा राग आणि आक्रमकपणा पाहून थरथरत होता. आता हे प्रकरण अंगावर शेकणार असे वाटत असताना तो मिटवण्याची मितभाषा व गयावाया करू लागला. माझ्या बायकोचा आणि माझा पगार देतो, एवढे लाख देतो तेवढे देतो. थांबवा तुम्ही हे प्रकरण, मी बदली करून घेतो. एकवेळ माफ करा, अशी विनंती करू लागला.बरा खडीचा नव्हे तर विनंतीचा पारा वाचू लागला मात्र संतप्त झालेल्या मुलीच्या पालकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्याला शिव्यांची लाखोली वाहिली. याला सोडायचा नाही. याने आज इथे घटना केली आहे, उद्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन तसाच प्रकार करेल. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. याला पोलिसांच्या ताब्यात द्या. या प्रकाराने सारेच पेटून उठले त्यांनी लगेचच ही मागणी मान्य केली. पोलिसांना बोलावण्यात आले.
राज्यातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचारांच्या घटना घडत असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक, डीवाय एस पी, पीएसआय अधिकारी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्थी करत शिक्षकाला ताब्यात घेतले. मात्र एवढा संतप्त जमाव झालेला असताना एकानेही त्या शिक्षकावर हात उचलण्याचा प्रयत्न केला नाही. कायदा हातात घेतला नाही, गुरू समान शिक्षकाला ग्रामस्थांनी आपला संयम दाखवला होता. त्यांच्या भावनांशी हा नराधम खेळला होता तरीही शांततेच्या मार्गाने पोलिसांच्या स्वाधीन केला
आरोपीला दया दाखवणार नाही
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्या शिक्षकाची गचांडी धरून गाडीत कोंबले. आरोपीला कोणतीही दया माया दाखवणार नाही, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. याप्रमाणे पोलीस तपासही त्याच दिशेने सुरू आहे. आरोपीची गय केली जाणार नाही त्याला कड्क शिक्षा होण्यासाठी योग्य ती कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी दिले. त्याच्यावर पोस्को कायद्या अंतर्गत कलमे लावून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.